Lakshmikant Berde Birth Anniversary: विनोदीवीर लक्ष्मीकांत बेर्डे यांचे धनंजय माने इथेच राहतात का ते भुसनाळ्यापर्यंत हिट कॉमेडी सीन्स, Watch Videos
या डायलॉग इतर अनेक विनोदी भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत
Lakshmikant Berde 66th Birth Anniversary: मराठी सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपल्या विनोदी अभिनयाने सर्वांच्या मनावर अधिराज्य करणा-या विनोदीवीर लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांची आज 66 वी जयंती. लक्ष्मीकांत ऊर्फ लक्ष्या आजही लोकांच्या मनात कायम आहे. आपल्या विनोदाने लोकांना लोटपोट करणारा हा हरहुन्नरी कलाकाराने आपल्यामधून खूप लवकर एक्झिट घेतली. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत निर्माण झालेली पोकळी ही कधीच भरून न येण्यासारखी आहे. असा अभिनेता पुन्हा होणे नाही ही एकच गोष्ट यावेळी आवर्जून सांगावीशी वाटते. बनवाबनवी (Banvabanvi) पासून पछाडलेला चित्रपटांपर्यंत आपल्या विनोदी अभियाने त्यांनी लोकांवर जणू जादूच केली. या चित्रपटातील त्यांचे विनोदी संवाद आजही लोकांना आठवले तरीही त्यांना हसू आवरत नाही.
अलीकडच्या काळात त्यांचा धनंजय माने इथेच राहतात का डायलॉग सोशल मिडियावर आजच्या तरुणाईने प्रचंड लोकप्रिय केला आहे. या डायलॉग इतर अनेक विनोदी भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत.Lakshmikant Berde Birth Anniversary: विनोदवीर लक्ष्मीकांत बेर्डे याच्या अजरामर सिनेमातील 'ही' धम्माल गाणी तुम्हाला आठवतात का?
पाहूयात लक्ष्मीकांत बेर्डे यांचे '3' हिट कॉमेडी सीन्स:
बनवाबनवी
झपाटलेला
पछाडलेला
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठीप्रमाणे हिंदीतही स्वत:ची अशी वेगळी छाप सोडली आहे. हम आपके है कौन, भविष्यवाणी, अनाडी, मैने प्यार किया असे अनेक हिट चित्रपट त्यांनी दिले आहेत. त्यांच्या सारखी कॉमेडी करणे हे कुणाला जमले नाही आणि जमणारही नाही. अशा हरहुन्नरी कलाकारास लेटेस्टली मराठीचा सलाम!