Khashaba Controversy: नागराज मंजुळे यांचा 'खाशाबा' सिनेमा मूळ कथेच्या कॉपीराईट्स वरून अडकला वादात, कोर्टाने बजावले समन्स;पहा प्रकरण काय?

कोर्टाने त्यांना आता कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे.

Nagraj Manjule | Insatgaram

दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Mangule)  याचा आगामी सिनेमा 'खाशाबा' वादाच्या भोवर्‍यात अडकला आहे. या सिनेमाच्या मूळ कथेच्या कॉपीराईट्स  वरून वाद निर्माण झाल्याने आता हे प्रकरण थेट न्यायालयामध्ये पोहचलं आहे. लेखक संजय दुधाणे यांनी त्यांच्याकडे खाशाब जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क त्यांच्याकडे असल्याचं म्हटलं आहे त्यामुळे आता त्यांनी नागराज मंजुळे तसंच जिओ स्टुडिओ, आटपाट प्रोडक्शन आणि ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. कोर्टाने त्यांना आता कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे.

संजय दुधाणे यांच्या दाव्यानुसार, त्यांच्याकडे 2001 पासून खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क आहेत. त्यासाठी त्यांना सरकारचं कॉपीराईट ऑफिस मधून प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.त्यामुळे आता त्यांनी नागराज मंजुळे यांच्या चित्रपटाविरूद्ध आक्षेप नोंदवला आहे. वकिलांमार्फत त्यांनी पुण जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. Nagraj Manjule New Movie: नागराज मंजुळेंच्या नव्या ‘खाशाबा’ चित्रपटाची घोषणा, 'झुंड'नंतर पुन्हा दिग्दर्शीत करणार खेळावर चित्रपट .

नागराज मंजुळे यांनी फेब्रुवारी महिन्यात खाशाबा जाधव यांच्यावरील बायोपिकची घोषणा केली आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचं शूटिंग देखील सुरू झालं आहे. सिनेमाचा मुहूर्ताचा फोटो देखील नागराज कडून शेअर करण्यात आला आहे. पण आता या सिनेमाच्या अडचणी वाढल्या आहेत.

खाशाबा जाधव हे कुस्तीपटू होते. 1952 च्या ऑलिपिंक्स मध्ये त्यांनी कांस्य पदकाची कमाई केली होती. ऑलिम्पिक या मानाच्या स्पर्धेमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते.