Hirkani Trailer: आपल्या तान्हुल्याच्या भेटीची ओढ लागलेल्या आईची धडपड आणि अंगावर काटा आणणारा तिचा असामान्य लढा दाखवणारा 'हिरकणी' चित्रपटाचा ट्रेलर एकदा पाहाच
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला 'हिरकणी' (Hirkani) चित्रपटाचा ट्रेलर अखेप प्रदर्शित झाला. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख म्हणजेच या चित्रपटातील हिरकणीची भूमिका केली आहे.
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेला 'हिरकणी' (Hirkani) चित्रपटाचा ट्रेलर अखेप प्रदर्शित झालाय. अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी प्रमुख म्हणजेच या चित्रपटातील हिरकणीची भूमिका केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर बघताच अंगावर काटा उभा राहिल असा हिरकणीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून सोनाली कुलकर्णीच्या (Sonalee Kulkarni) अभिनयाचा एक वेगळाच पैलू आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरपासून टीजर पर्यंत या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता ही अगदी शिगेला पोहोचली होती.
हा ट्रेलर पाहिल्यानंतर मराठी मध्ये एक वेगळा आणि आव्हानात्मक असा प्रयोग केल्याचे समजते. यात कॅमेरा अँगल्स, सीन्ससाठी कलाकारांनी तसेच दिग्दर्शकांची घेतलेली मेहनतही तुम्हाला ट्रेलर बघितल्यावर कळेल. आपल्या बाळाला भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या 'हिरकणी' च्या थक्क करणा-या प्रवासाची शौर्यगाथा तुम्हाला यात पाहायला मिळेल.
हिरकणी चा ट्रेलर:
या चित्रपटात सोनाली कुलकर्णीसह अभिनेता अमित खेडेकर (Ameet Khedekar) प्रमुख भूमिकेत दिसेल. या चित्रपटाचे लेखन चिन्मय मांडलेकर(Chinmay Mandlekar) यांनी केले असून काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधील शिवराज्याभिषेक गीत प्रदर्शित झाले होते. हे गीत नऊ कलाकार आणि सहा लोककलांमधून सादर केले गेले आहे. 24 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
इरादा एन्टरटेनमेंट आणि राजेश मापुस्कर निर्मित हा चित्रपट येत्या 24 ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. हिरकणी चित्रपटाचा रोमांचित करणारा हा ट्रेलर पाहून चित्रपटाबाबात प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली असेल असे म्हणायला हरकत नाही.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)