Hirkani Teaser: बाळाला भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या 'हिरकणी'च्या थक्क करणाऱ्या प्रवासाची शौर्यगाथा
त्यानंतर हळू हळू या चित्रपटाबद्दलची झलक पाहायला मिळू लागली. आता बदलणाऱ्या प्रहराच्या ठोक्यावर वाजणाऱ्या तोफा आणि त्यामुळे होणारी एका आईची घालमेल दाखवणारा टीजर पेक्षकांच्या भेटीला आहे.
अखेर बहुप्रतीक्षेनंतर आगामी ‘हिरकणी’ (Hirkani) या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) याने मातृदिनावेळी या चित्रपटाची घोषणा केली होती. त्यानंतर हळू हळू या चित्रपटाबद्दलची झलक पाहायला मिळू लागली. आता बदलणाऱ्या प्रहराच्या ठोक्यावर वाजणाऱ्या तोफा आणि त्यामुळे होणारी एका आईची घालमेल दाखवणारा टीजर पेक्षकांच्या भेटीला आहे. चित्रपटामधील अगदी मोजकेच शॉट्स घेऊन हा टीजर बनवण्यात आला आहे, तरी तो प्रसंग, त्याची व्याप्ती, एका आईंची झालेली अवस्था अशा साऱ्या गोष्टी मनाला स्पर्शून जातात.
हिरकणी टीजर -
काही दिवसांपूर्वीच सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) या चित्रपटामध्ये हिरकणीची भूमिका साकारणार असल्याची बातमी आली होती. आता तिला प्रत्यक्ष या भूमिकेत पाहणे ही चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. प्रहाराबरोबर तोफ वाजत आहे, दुसरीकडे आपले तान्हे मूल सोडून आलेली आई व्याकूळ होत आहे. गडाचे दरवाजे बंद होतात आणि आईंचे आपल्या बाळाला भेटण्याचे मार्गही बंद होतात. त्यानंतर ही माऊली मोठ्या शर्थीने गड उतरते. हेच काही प्रसंग टीजरमध्ये दिसतात. या टीजरमधील महत्वाची आणि आकर्षित करून घेणारी गोष्ट म्हणजे याचे छायाचित्रण. उत्तम कॅमेरा अँगल्स, अचूक प्रकाश योजना, कला दिग्दर्शन यामुळे या टीजरला चार चांद लागले आहेत. (हेही वाचा: हिरकणी चित्रपटातील शिवराज्याभिषेक गीत प्रेक्षकांच्या भेटीला; 9 कलाकार, 6 लोककलांच्या माध्यमातून छ. शिवरायांना मानाचा मुजरा)
सोनाली कुलकर्णी अगदी काही शॉट्समध्ये दिसून येते, मात्र त्यातूनही तिचा आवेग. बाळाला ओढ स्पष्ट जाणवते. दरम्यान, या सिनेमाचे दिग्दर्शन प्रसाद ओक याने केले असून, लेखन चिन्मय मांडलेकर याचे आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटामधील शिवराज्याभिषेक गीत प्रदर्शित झाले होते. हे गीत नऊ कलाकार आणि सहा लोककलांमधून सादर केले गेले आहे. 24 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.