Father's Day 2020: रेणुका राहुल देशपांडे ते जिजा आदिनाथ कोठारे पर्यंत सोशल मीडिया वर गाजल्या 'या' मराठमोळ्या बाप लेक/लेकीच्या जोड्या! (See Photos & Video)
यानिमित्ताने आज आपण मराठमोळ्या बापलेक/ लेकीच्या काही अशा जोड्या पाहणार आहोत ज्या मागील काही दिवसात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या होत्या
Father's Day 2020 Special: आज म्हणजेच 21 जून ला जगभरात अनेक देशात फादर्स डे साजरा केला जात आहे. भारतातही अनेक वर्षांपासून जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हा पितृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. आज सकाळपासूनच या खास दिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेकांनी आपल्या बाबा सोबत फोटो स्टेटसला ठेवून डिजिटल सेलिब्रेशन सुरु केले आहे. या खास दिवसाच्या निमित्ताने आज आपण मराठमोळ्या बापलेक/ लेकीच्या काही अशा जोड्या पाहणार आहोत ज्या मागील काही दिवसात सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या होत्या. यामध्ये गायक राहुल देशपांडे (Rahul Deshpande) आणि त्याची लेक रेणुका (Renuka) सोबतच आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि त्याची लेक जिजा (Jija) , स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi) आणि त्याची बच्चे कंपनी अशा सगळ्यांचे काही खास फोटो आणि व्हिडीओ आपण आता या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला तर मग...
राहुल देशपांडे आणि रेणुका
राहुल आणि रेणुकाचा गातानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. लॉक डाऊन मध्ये घरबसल्या सहज केलेल्या या व्हिडिओला इतके व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले की काहीच दिवसात रेणुकाची नावाचे फॅनपेज सुद्धा सोशल मीडियावर सुरु झाले.
आदिनाथ कोठारे- जिजा
आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांची लेक जिजा ही जन्मापासूनच चर्चेत आली होती, जिजा बोलायला लागल्यापासून तर तिचे आई बाबा तिचे अनेक व्हिडीओ ऑनलाईन पोस्ट करत असतात, या व्हिडीओजमध्ये चुणचुणीतपणे गप्पा मारणारी, डान्स करणारी जिजा ही नेहमीच कौतुकाचा विषय ठरते.
सिद्धार्थ जाधव आणि त्याच्या लेकी
सिद्धार्थ जाधव सुद्धा आपल्या दोन्ही लेखी इरा आणि स्वर जाधव यांचे व्हिडीओज इंस्टाग्राम वर पोस्ट करत असतो. लॉकडाऊन लागू झाल्यावर सर्वांना घरात राहण्याचं आवाहन करणारा इरा आणि स्वराचा व्हिडीओ सुद्धा सिद्धूच्या फॅन्सच्या चांगलाच पसंतीस उतरला होता.
स्वप्नील जोशी- राघव आणि मायरा
स्वप्नील जोशी ने अलीकडेच आपल्या दोन्ही मुलांच्या साठी पिल्लू टीव्ही म्हणून एक युट्युब चॅनेल सुरु केला आहे. यात राघव आणि मायराचे अनेक किस्से स्वप्नील शेअर करत असतो.
पुष्कर जोग- फेलीशा
पुष्कर जोग आणि त्याची मुलगी फेलीशा यांचेही अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत असतात. बिग बॉस मध्ये पुष्कर असताना एका टास्क मध्ये फेलीशा त्याला भेटायला आली होती त्यावेळेपासून तिची बरीच चर्चा आहे. आज सुद्धा पुष्करने आपल्या लेकीसोबतचा एक सुंदर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आजच्या या फादर्स डे निमित्त तुम्हा सर्वांना लेटेस्टली परिवाराकडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा!