Girlfriend Teaser 3: अमेय वाघ च्या 'गर्लफ्रेंड' सिनेमाच्या तिसर्या टीझर मध्ये रसिका सुनील, ईशा केसकर ची झलक (Watch Video)
उपेंद्र सिधये लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 26 जुलै 2019 दिवशी प्रदर्शित होणार आहे.
Amey Wagh's Girlfriend Movie Teaser 3: अमेय वाघ (Amey Wagh) आणि सई ताम्हणकर (Sai Tamhankar) या जोडीचा 'गर्लफ्रेंड' सिनेमाचा तिसरा टीझर आज रसिकांच्या भेटीला आला आहे. अमेय वाघ या सिनेमात मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत सई पहिल्यांदा झळकणार आहे. गर्लफ्रेंडच्या शोधात असलेल्या सामान्य मुलाच्या आयुष्याभोवती फिरणारा हा सिनेमा आहे. त्यामध्ये 'नचिकेत' हे पात्र अमेय वाघ साकारत आहे. यापूर्वी 'गर्लफ्रेंड' सिनेमाचे दोन टीझर प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यामध्ये 'नचिकेत' (अमेय वाघ) आणि अलिशा (सई ताम्हणकर) या व्यक्तिरेखांची झलक पहायला मिळाली आहे.
गर्लफ्रेंड टीझर 3
गर्लफ्रेंडच्या तिसर्या टीझरमध्ये कविता लाड, यतिन कार्लेकर, रसिका सुनिल, ईशा केसकर या कलाकारांचीदेखिल झलक पहायला मिळाली आहे. कविता लाड अमेय साकरत असलेल्या 'नचिकेत' या भूमिकेच्या आईची तर यतिन कार्लेकर वडीलांच्या भूमिकेत आहेत.
उपेंद्र सिधये लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 26 जुलै 2019 दिवशी प्रदर्शित होणार आहे.