फिल्मफेअर मराठी पुरस्कार 2018 : अमेय वाघ, सोनाली कुलकर्णी, मिथिला पालकर, अभिनय बेर्डेने पटकावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा मान
पहा यंदाच्या मराठी फिल्मफेअर सोहळ्यामध्ये कोणी मारली बाजी
मुंबईत नुकताच 4था मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. हिंदी सिनेसृष्टीप्रमाणेच प्रतिष्ठित आणि तितकाच ग्लॅमरस समजला जाणार्या फिल्मफेअरची उत्सुकता मराठी रसिकांसोबतच कलाकारांनाही असते. नव्या दमाचे आणि उमदे कलाकार यंदा नॉमिनेशनमध्ये असल्याने सार्यांनी यंदा फिल्मफेअरमध्ये कोणी बाजी मारली याची कमालीची उत्सुकता होती.
4 थ्या फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्याचे मानकरी -
सर्वोत्कृष्ट अभिनेता - अमेय वाघ
मुरांबा या चित्रपटासाठी अमेय वाघला सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरूष) हा पुरस्कार मिळाला.
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - सोनाली कुलकर्णी
मराठी, हिंदी सोबतच अनेक भारतीय प्रादेशिक भाषांमधून ते थेट इंटरनॅशनल प्रोजेक्ट्सचाही एक भाग असणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला 'कच्चा लिंबू'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
कच्चा लिंबूचा दिग्दर्शक प्रसाद ओकला सर्वोत्कृष्ट दिग्दर्श्काचा पुरस्कार मिळाला.
नवोदित कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेता अभिनय बेर्डेला बेस्ट डेब्यू मेल तर मुरांबा साठी मिथिला पालकरला बेस्ट डेब्यू फिमेल या पुरस्काराने गौरवण्यात आले.
समिक्षकांच्या दृष्टीने 'हलाल' हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. तर समिक्षकांनी कासव सिनेमासाठी इरावती हर्षे आणि रिंगण सिनेमाचा अभिनेता शशांक शेंडेचा सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने गौरव केला.
फिल्म फेअर मराठी पुरस्कार सोहळ्यात पंडित ह्रद्यनाथ मंगेशकरांना 'जीवन गौरव' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. दिल दोस्ती दुनियादारी फेम सुव्रत जोशी आणि अमेय वाघ यांनी पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केले. या सोहळयात अभिनेता स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर, स्मिता गोंदकर, वैदेही परशूराम, प्राजक्ता माळी यांचे डान्स परफॉर्मंस झाले आहेत.