Fatteshikast Poster: शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर; फत्तेशिकस्त 15 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित

हा सिनेमा 15 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित आहे.

Fatteshikast (Photo Credits: Twitter)

Fatteshikast Chinmay  Mandlekar Poster:  फर्जंद सिनेमानंतर आता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) 'फत्तेशिकस्त' (Fatteshikast) हा सिनेमा घेऊन येण्यास सज्ज झाला आहे. छत्रपती शिवाजी माहाराजांच्या कुशल राजनीतीचं दर्शन घडवणारा 'फत्तेशिकस्त' पुन्हा मराठी रसिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शत्रूवर सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या नीतीची रूपेरी पडद्यावर झलक दाखवणार आहे. या सिनेमाचं नवं पोस्टर आज लॉन्च करण्यात आलं आहे. यामध्ये अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay  Mandlekar) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुख्य भूमिकेत आहे. सध्या सोशल मीडियामध्ये शिवरायांच्या दमदार अंदाजातील चिन्मयच्या पोस्टरचं सर्वत्र कौतुक होत आहे.

मूठभर मावळ्यांच्या साथीने मुघलांना धडा शिकवणार्‍या शिवाजी महाराजांच्या युद्ध नीतीमध्ये 'गनिमी कावा' हा त्यांना फायदेशीर ठरला. याच रोमांचकारी गनिमी काव्यावर आधारित शिवरायांचे सर्जिकल स्ट्राईक 'फत्तेशिकस्त' या सिनेमातून रसिकांसमोर उलगडणार आहे. यापूर्वी मालिका आणि सिनेमांमधून अभिनेता अमोल कोल्हे, महेश मांजरेकर यांनी शिवरायांची भूमिका साकराली होती.  'फत्तेशिकस्त' सिनेमाचं पहिलं पोस्टर; उलगडणार शिवाजी महाराजांनी केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'ची कहाणी

फत्तेशिकस्त पोस्टर

फत्तेशिकस्त  Teaser

'फत्तेशिकस्त ' सिनेमामध्ये मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर,अनुप सोनी अशी तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. हा सिनेमा 15 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे.