‘हंड्रेड’ वेबसीरिजसाठी बॉलिवूडचा सुप्रसिद्ध रॅपर रफ्तार ने तयार केलं ‘चौकना...बच के रहेना' रॅप साँग; पहा व्हिडिओ
गेल्या महिन्यात रिंकूची ‘हंड्रेड’ ही वेबसीरिज रिलीज झाली होती. हे रॅप साँग ‘हंड्रेड’ या वेबसीरिजमधील सौम्या व नेत्रा या पात्राला समर्पित आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताने सौम्याची भूमिका साकारली आहे, तर रिंकूने नेत्राची भूमिका साकारली आहे.
‘हंड्रेड’ वेबसीरिजसाठी (Hundred Webseries) बॉलिवूडचा सुप्रसिद्ध रॅपर रफ्तार (Rapper Raftar) ने ‘चौकना...बच के रहेना' रॅप साँग तयार केलं आहे. गेल्या महिन्यात रिंकू राजगुरूची ‘हंड्रेड’ ही वेबसीरिज रिलीज झाली होती. हे रॅप साँग ‘हंड्रेड’ या वेबसीरिजमधील सौम्या व नेत्रा या पात्राला समर्पित आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताने सौम्याची भूमिका साकारली आहे, तर रिंकूने नेत्राची भूमिका साकारली आहे.
येत्या 3 जूनला आर्चीचा म्हणजेचं रिंकूचा वाढदिवस आहे. रिंकूच्या वाढदिवसापूर्वी रफ्तारने तिला वाढदिवसाचं गिफ्ट दिलं आहे. या गाण्यात रफ्तार, कृष्णा आणि करण वाही दिसतं आहेत. ‘चौकना...बच के रहेना’ असे या गाण्याचे बोल आहेत. या रॅप साँगमध्ये करण वाही अॅक्टिंग करताना पाहायला मिळतोय. तर रफ्तार सौम्याची गोष्ट सांगत आहे. तसेच कृष्णा नेत्राची कथा सांगत आहे. सध्या सोशल मीडियावर हे रॅप साँग प्रचंड व्हायरल झालं आहे. (वाचा - Parinati Marathi Film: अमृता सुभाष व सोनाली कुलकर्णी यांचा ‘परिणती’ ठरणार OTT Platforms वर प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट)
लॉकडाऊन काळात रिंकूने चाहत्यांच्या मनोरंजनासाठी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विविध व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओज ला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरू महाराष्ट्रातचं नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झाली. गेल्या महिन्यात रिंकूची भूमिका असलेली वेबसिरिज ‘हंड्रेड’ प्रदर्शित झाली. या वेबसिरीजमध्ये लारा दत्ताने एसीपी सौम्या शुक्ला नावाच्या महिला पोलिसांची भूमिका साकारली आहे. तसेच रिंकूने एका गंभीर आजाराने पीडित तरूणी नेत्राची भूमिका साकारली आहे.
तरुण आणि सर्वांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरुने अभिनय क्षेत्रात उंची गाठली आहे. रिंकूने 2016 साली धमाकेदार फिल्म सैराटमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. रिंकू नागराज मंजूळेच्या 'झुंड' चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.