Bigg Boss Marathi 1 ची स्पर्धक रेशम टिपणीस नव्या कोऱ्या सिनेमासह येणार प्रेक्षकांच्या भेटीला; टीम सोबत शेअर केले खास फोटो (See Photos)
बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 1) पहिल्या पर्वाची स्पर्धक रेशम टिपणीस ही एका नव्या कोऱ्या सिनेमासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत माहित देत तिने नुकतेच आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे.
हिंदी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक चित्रपटांमधून व मालिकांमधून समोर आलेली अभिनेत्री रेशम टिपणीस (Resham Tipnis) हिला बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 1) पहिल्या पर्वामुळे पुन्हा एकदा वेगळी ओळख मिळाली. आपल्या धडाकेबाज व्यक्तिमत्वामुळे रेशमी ही बिग बॉस मधील चर्चेचा विषय ठरली, तिच्या नावाने सोशल मीडियावर फॅन्स पेजेस सुरु झाले. रेशमच्या या सर्व फॅन्ससाठी तिने अलीकडेच एक खुशखबर जाहीर केली आहे. येत्या काही दिवसातच एका नव्या कोऱ्या सिनेमासह रेशम प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. याबाबतच माहिती देताना तिने आपल्या इंस्टाग्राम वरून चित्रपटाच्या टीम सोबत काही खास फोटो शेअर केले आहेत.
रेशम ने शेअर केलेल्या फोटो मध्ये अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सयाजी शिंदे, वैदेही परशुरामी, विजय पाटकर ही कलाकार मंडळी सुद्धा दिसून येत आहेत, या सर्वांसोबत रेशीम मागील काही दिवसांपासून बर्मिंगहममध्ये सिनेमाचे चित्रीकरण करत आहे.
रेशम टिपणीस इंस्टाग्राम पोस्ट
Exclusive: Bigg Boss Marathi 2 फेम अभिजीत बिचुकले ठरणार का उदयनराजेंसाठी डोकेदुखी?
रेशमने आपल्या या नव्या सिनेमाच्या दिग्दर्शकासोबत सुद्धा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना " जेव्हा तुमचा जुना मित्र त्याची दुसरी मॉव्ही दिग्दर्शित करत असतो आणि तुम्हाला त्याचा भाग बनण्याची संधी मिळते तेव्हा खूप भारी वाटते असे रेशमने सांगितले आहे.
तूर्तास या सिनेमाचे नाव अथवा प्रदर्शनाची तारीख याबाबत माहिती टीम ने जाहीर केली नसली तरी फोटो पाहिल्यानंतर रेशमच्या फॅन्ससहित अन्य कुलकर्णी देखील सिनेमासाठी उत्साह दाखवत टीम ला शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉस नंतर लगेचच रेशमने वस्त्रहरण या नाटकातून रंगभूमीवर पुन्हा पदार्पण केले होते.