Baloch Poster: प्रविण तरडे पुन्हा ऐतिहासिक भूमिकेत; 'बलोच' सिनेमातून सांगणार पानिपतावरील पराभवानंतरची मराठ्यांची कहाणी
मराठ्यांच्या पोशाखात, पिळदार मिश्यांमध्ये असलेल्या प्रवीणच्या चेहर्यावर एक हतबलता आणि डोळ्यात आग आहे.
पानिपताच्या तिसर्या युद्धात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अनेकांना बलुचिस्तान मध्ये गुलामगिरी पत्करावी लागली. मराठ्यांच्या इतिहासातील या गोष्टींवर भाष्य करणारा 'बलोच' (Baloch) हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. आज या सिनेमाचं पोस्टर लॉन्च करण्यात आले आहे. अभिनेता प्रवीण तरडेचं (Pravin Tarde) पोस्टर आज सोशल मीडीयामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. 'बलोच सिनेमाची कथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रकाश पवार सांभाळणार आहेत.
बलोचच्या पोस्टर वर रांगड्या प्रवीण तरडेचा अजून एक अंदाज पहायला मिळत आहे. मराठ्यांच्या पोशाखात, पिळदार मिश्यांमध्ये असलेल्या प्रवीणच्या चेहर्यावर एक हतबलता आणि डोळ्यात आग आहे. प्रवीण सोबतच या सिनेमा मध्ये भाऊराव कर्हाडे, तेजश्री जाधव, विशाल निकम, रोहित अव्हाळे आहे. लवकरच हा सिनेमा रीलीज होणार आहे. अद्याप त्याची रीलीज डेट जाहीर करण्यात आलेली नाही.
बलोच पोस्टर
प्रविण तरडे याचा हा दुसरा रीलिज साठी सज्ज असलेला ऐतिहासिक सिनेमा आहे.'सरसेनापती हंबीरराव' या सिनेमामध्येही प्रविण तरडे मुख्य भूमिकेत आहे. हा मराठीत बिग बजेट सिनेमांमधील एक आहे. त्यामुळे याबद्दलही विशेष उत्सुकता आहे. पानिपत किंवा मराठ्यांच्या सुवर्णमय इतिहासावर अनेक सिनेमे, मालिका आल्या, गाजल्या पण पानिपतावर झालेल्या पराभवानंतर मराठा साम्राज्याची, शिलेदारांची अवस्था पहिल्यांदाच अशाप्रकारे 'बलोच' द्वारा रूपेरी पडद्यावर येणार आहे. Third Battle of Panipat: पानिपतच्या 3 ऱ्या लढाईपासून सुरु झाला मराठेशाहीचा ऱ्हास; जाणून घ्या या युद्धात का झाला मराठ्यांचा पराभव ?
सध्या कोरोना लॉकडऊन मध्ये सिनेमा थिएटर मध्ये रिलीज होत नसल्याने या अनेक बिग बजेट सिनेमे प्रतिक्षेत आहेत.