Tikiti Tok Song in Vicky Velingkar: घड्याळ्याच्या काट्यावर धावणा-या लोकांची झालेली अवस्था मांडेल विक्की वेलिंगकरमधील 'टिकीटी टॉक' हे गाणे

पाहा व्हिडिओ

Vicky Velingkar Song (Photo Credits: YouTube)

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या 'हिरकणी' चित्रपटाच्या यशानंतर या तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे ती विक्की वेलिंगकर (Vicky Velingkar) या चित्रपटाची. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते. यात सोनालीचा हटके लूक प्रेक्षकांना आवडला होता. सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ‘विक्की वेलिंगकर’ ही प्रमुख भूमिका साकारत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सौरभ वर्मा करणार आहेत. आता या सिनेमाचे टिकीटी टॉक हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या प्रसिद्ध गायक अवधुत गुप्ते आणि ओंकार पाटील यांनी गायले आहे.

या गाण्याविषयी बोलायचे झाले सध्या धकाधकीचे आयुष्य जगत असलेले लोक यांच्या आयुष्यात घड्याळ्याच्या काट्याला किती महत्व आहे हे सांगितले आहे. पाहा व्हिडिओ

हेदेखील वाचा- Vicky Velingkar Movie Poster: अभिनेत्री सोनाली कुलकर्णी च्या मुख्य भूमिकेतील ‘विक्की वेलिंगकर’सिनेमाचं पोस्टर रसिकांच्या भेटीला; 6 डिसेंबरला सिनेमा होणार रीलीज

हे गाणे सुमित तांबे यांनी लिहिले असून ओमकार पाटील या गाण्याचे संगीतकार आहेत. ‘विक्की वेलिंगकर’या चित्रपटाची निर्मिती जीसिम्स, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांनी केली आहे.

विक्की वेलिंगकर हा सिनेमा 6 डिसेंबर 2019 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या सोनाली कुलकर्णीचे येत्या वर्षभरात 3 मोठे सिनेमे रसिकांच्या भेटीला येणार आहेत.