अमृता खानविलकर ने Eifel Tower समोर आईचा फोटो काढण्यासाठी घातले रस्त्यात लोटांगण; पहा हा धम्माल क्षण
सिनेमाच्या चित्रीकरणातून वेळ काढत आपली आई व बहीण यांच्यासमवेत तिने काही लोकल गोष्टी आवर्जून ट्राय केल्या आणि त्यांचा अनुभव आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर सुद्धा केला आहे.
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) ही सध्या युरोप (Europe) वारी मध्ये धम्माल करत आहे. सिनेमाच्या चित्रीकरणातून वेळ काढत आपली आई व बहीण यांच्यासमवेत तिने काही लोकल गोष्टी आवर्जून ट्राय केल्या आणि त्यांचा अनुभव आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर सुद्धा केला आहे. याच ट्रीपमध्ये अमृता पॅरिसच्या आयफील टॉवरला (Eifel Tower) गेली होती. एखाद्या हौशी टुरिस्ट प्रमाणे तिने देखील या भव्य वास्तू समोर स्वतःचा फोटो काढला,पण खरी गमंत तर तेव्हा घडली जेव्हा तिने टॉवरच्या समोर आपल्या आईचा फोटो काढण्यासाठी अक्षरशः रस्त्यावर लोटांगण घातलं. टॉवर आणि आई असा अँगल घेताना सरळ फोटो येत नव्हता म्हणून मग युक्ती करून अमृता थेट रस्त्यातच आडवी झाली आणि फोटो काढला.
अमृता खानविलकरने नुकतेच हे फोटो आपल्या इंस्टाग्राम वरून शेअर केले आहेत, यावरती मजेशीर कॅप्शन देताना तिने आपल्या पालकांच्या चांगल्या फोटोसाठी किती मेहनत करावी लागते हे बघा असे म्हंटले आहे.
अमृताने या ट्रीप मध्ये आणखीन एक धम्माल गोष्ट केली ती म्हणजे आईस स्केटिंग. येत्या महिन्याभरावर येऊन ठेपलेल्या ख्रिसमस साठी आतापासूनच युरोप मध्ये तयारी सुरु आहे. हीच तयारी दाखवत तिने एक व्हिडीओ शेअर केला होता यामध्येच तिने आईस स्केटिंग करतानाचा अनुभव देखील सांगितला आहे.
अमृता ही मराठी सिनेसृष्टीतील मानलेल्या कलाकारांपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वी तिने आपले मत मांडताना मराठीत हिंदीसारखे चित्रपट बनायला हवेत. त्याच-त्याच फॉर्म मधल्या भूमिका करुन प्रेक्षकांना नाराज केलं जाऊ नये म्हणून मी वेगवेगळ्या माध्यमांसाठी काम करतेय. पण हिंदी बरोबरच मराठी चित्रपटातही मी कायम आहे, माझे दोन मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतील, असेही तिने सांगितले आहे.