Aaple Saheb Thackeray: महाराष्ट्राचा वाघ आला म्हणतं 'ठाकरे' सिनेमातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे गाणे प्रदर्शित

या चित्रपटातील मराठी वर्जनमधील गाणे 'आपले साहेब' प्रदर्शित करण्यात आले आहे.

ठाकरे चित्रपट (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांच्या आयुष्यावर आधारित असलेला चित्रपट 'ठाकरे' येत्या 25 जानेवारी, 2019 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील मराठी वर्जनमधील गाणे 'आपले साहेब ठाकरे' प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) बाळासाहेबांची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. या गाण्यामधून बाळासाहेबांचे कणखर व्यक्तिमत्व झळकणार आहे.

 

View this post on Instagram

 

कोण आल रे, कोण आला? महाराष्ट्राचा वाघ आला...बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वासारखंच दमदार असं ‘ठाकरे’ चित्रपटातील गाणं पाहा इथे: Link in Bio. #ThackerayTheFilm #Thackeray @sanjay___raut @nawazuddin._siddiqui @amrita_rao_insta @viacom18marathi @viacom18motionpictures #AjitAndhare @abhijitpanse @purvashi_raut #VidhitaRaut #VarshaRaut #DrShrikantBhasi @rauters_entertainment @carnivalpicturesindia @thackeraythefilm @avadhoot_gupte @rohangoks @rohanap1 #ZeeMusicMarathi

A post shared by RAUT'ERS ENTERTAINMENT (@rauters_entertainment) on

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठाकरे सिनेमाची कथा लिहिली आहे. तर अभिजीत पानसे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'आला डरकाळी फोडत वाघ रे अशी धगधगती मनात आग रे' असे या गाण्याचे बोल प्रत्येकाच्या अंगावर काटा आणणारे आहेत. तर सोशल मीडियावर या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. (हेही वाचा-Thackeray Song Aaya Re Thackeray: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शान दाखवणारे 'आया रे ठाकरे' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला)

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील हिंदी वर्जन मधील 'आया रे ठाकरे' या गाण्याचा लाँन्चिंग सोहळा मुंबईत पार पडला. तसेच नवाजुद्दीक सिद्दीकी ह्याचे बाळासाहेबांच्या भुमिका प्रेक्षकांच्या मनावर घर करणार की नाही हे आता पाहण्याजोगे ठरणार आहे.