बॉक्सऑफिसवर Thugs Of Hindosthan ला टक्कर देणार्‍या आणि.. डॉ.काशिनाथ घाणेकर सिनेमाबाबत आमिर खान म्हणाला ...

अभिनेता सुबोध भावे या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे.

आणि.. डॉ.काशिनाथ घाणेकर Photo Credit : Instagram

यंदा दिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूडमध्ये बहुप्रतिक्षित आणि यशराजचा भव्य दिव्य सिनेमा ठ्ग्स ऑफ हिंदोस्तान रिलिज होणार आहे. त्यासोबतच मराठीत सुबोध भावेचा 'आणि.. डॉ.काशिनाथ घाणेकर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.आमिर खान आणि अमिताभ बच्चन या बॉलिवूडच्या दोन बड्या कलाकारांना पहिल्यांदा रूपेरी पडद्यावर पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे रसिकांमध्ये 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाबाबत विशेष उत्सुकता आहे.

आमिर खानने लेटस्ट ली शी बोलताना दिवाळीच्या दिवसातच तो 'आणि.. डॉ.काशिनाथ घाणेकर' हा मराठी सिनेमा पहाणार असल्याचं सांगितलं आहे. आमिर खान मराठी सिनेमांचा चाहता आहे. आमिर खानची पत्नी किरण रावचा वाढदिवस 7 नोव्हेंबरला आहे. त्यामुळे तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन म्हणून आवर्जून 'आणि.. डॉ.काशिनाथ घाणेकर' पहाणार असल्याचा प्लॅन आमिर खानने शेअर केला आहे.

कॉफी विथ करण शोमध्ये आमिर खानने करणशी बोलताना पहिल्यांदा 'ठ्ग्स ऑफ़ हिंदोस्तान' या सिनेमात आपण सामाजिक संदेश देणार्‍या चित्रपटाचा भाग नसणारी एक भूमिका साकरत आहोत याचं दडपण असल्याची कबुली दिली आहे. भूमिका आवडली म्हणून 'ठ्ग्स ऑफ़ हिंदोस्तान' निवडला पण रसिक मला 'अशा' भूमिकेत स्विकारतील का? ही धाकधूक रीलिजपर्यंत कायम राहणार आहे.

डॉ. काशिनाथ घाणेकर हे मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार आहेत. काशिनाथ घाणेकरांनी अनेक भूमिका अजरामर केल्या आहे. अभिनेता सुबोध भावे या चित्रपटा डॉ. काशिनाथ घाणेकरांची भूमिका साकारणार आहे. तर आणि…डॉ.काशिनाथ घाणेकर या सिनेमात हे कलाकार साकारणार दिग्गजांच्या भूमिका

बॉलिवूडच्या बिग बजेट सिनेमांसमोर अनेकदा मराठी सिनेमांना तग धरून ठेवणं हे मोठं आव्हान असतं. अनेकदा मल्टिप्लेक्समध्ये स्क्रिन शेअर करण्यावरून वाद होतात. त्यामुळे यंदा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' समोर 'आणि.. डॉ.काशिनाथ घाणेकर' हा सिनेमा बॉक्सऑफिसवर कशी कामगिरी करतोय? हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे. ट्रेलर पहा आणि तुम्हीच ठरवा तुम्ही आधी पहाणार  'आणि.. डॉ.काशिनाथ घाणेकर की  ठग्स ऑफ हिंदोस्तान ?