मराठी कलाकार आणि तंत्रज्ञ यांना 'म्हाडा' देणार घरं; उदय सामंत यांची घोषणा

पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या भागातील कलाकारांना विरार मध्ये घरं मिळणार आहेत. कलाकारांच्या घरांच्या प्रश्नावर आदेश बांदेकरांनी चर्चा केली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे

म्हाडा (Photo Credits-Facebook)

मराठी कलाकारांना आणि तंत्रज्ञांना मुंबईमध्ये हक्काचं घर मिळावं म्हणून 'म्हाडा'(MHADA) नं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मराठी कलाकार, तंत्रज्ञ यांना MMR म्हणजे मुंबई महानगर विभाग यामध्ये घरं दिली जाणार आहेत अशी महत्त्वपूर्ण घोषणा म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत (Uday Samant) यांनी केली आहे. आज उदय सामंत आणि आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांच्यामध्ये बैठक झाली त्यानंतर या महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.

म्हाडाच्या निर्णयाचा फायदा आता मराठी कलाकार आणि तंत्रज्ञांना होणार आहे. पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या भागातील कलाकारांना विरार मध्ये घरं मिळणार आहेत. कलाकारांच्या घरांच्या प्रश्नावर आदेश बांदेकरांनी चर्चा केली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच म्हाडा गिरणी कामगारांसाठीदेखील घराची लॉटरी काढणार आहे. तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांप्रती दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशीचे आदेश

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नुकतेच तिवरे धरण फुटल्याने सात गावं वाहून गेली आहेत. ही दुर्घटनाग्रस्त गावं मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर न्यासाने दत्तक घ्यावी अशी विनंती करण्यात आली आहे. त्यानुसार याबददल सकारात्मक विचार केला जाईल अशी माहिती आदेश बांदेकरांनी दिली आहे. गावं दत्तक घेण्यासोबतच दुर्घटनाग्रस्त गावांचं पुनर्वसन सिद्धिविनायक मंदीर न्यासाकडून करण्यात यावं असं देखील सांगण्यात आलं आहे.