तामिळनाडूमध्ये राजकीय वादंग माजवणाऱ्या 'सरकार' चित्रपटामधील 'ते' सिन्स हटवण्याची निर्मात्यांची तयारी

अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्यांनी चित्रपटामधील पक्षाच्या विरोधात असलेले सर्व सिन्स हटवण्याची मागणी केली होती, त्यामुळे आता राज्यात होत असलेला हिंसाचार पाहता चित्रपटाच्या निर्मात्यांनी या नेत्यांची मागणी मान्य केली आहे

विजय (photo credits: Sun Pictures)

दाक्षिणात्य अभिनेता विजय याचा चित्रपट 'सरकार' संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने तामिळनाडू येथे बाहुबलीचे रेकॉर्ड तोडले आहेत, मात्र हा चित्रपट वाद-विवादांच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटामधील काही सिन्समुळे तामिळनाडू येथे चित्रपटाविरुद्ध निषेध केला असून, यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे.

अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्यांनी नेत्यांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला आहे. द्रमुकचे (दिवंगत नेते करूणानिधी यांचा पक्ष) कलानिधी मारन हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटातील काही दृश्ये आणि संवाद अण्णाद्रमुकच्या विरोधात असल्याचा दावा, अण्णाद्रमुकच्या नेत्यांनी केला आहे. या चित्रपटात एक खलनायिका दाखवण्यात आली असून महिला मुख्यमंत्र्याचे हे पात्र जयललिता यांच्यावर आधारीत असल्याचा अण्णाद्रमुकचा दावा आहे. या पात्राच्या तोंडचे संवादही आक्षेपार्ह असल्याचे या पक्षाने म्हटले आहे. या चित्रपटामुळे समाजामध्ये हिंसा पसरवली जात असल्याचे पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे आहे.  त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होताच या पक्षाच्या नेत्यांची, आमदारांनी चित्रपटगृहांच्या बाहेर निदर्शने सुरू केली आहेत.

ए. आर. मुरुगदास या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, गुरुवारी रात्री पोलिस त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते मात्र ते घरी सापडले नाहीत. आता मिळालेल्या माहितीनुसार मुरुगदास यांनी आता या गोष्टीविरुद्ध कोर्टात धाव घेतली आहे. अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्यांनी चित्रपटामधील पक्षाच्या विरोधात असलेले सर्व सिन्स हटवण्याची मागणी केली होती, त्यामुळे आता राज्यात होत असलेला हिंसाचार पाहता चित्रपटाच्या निर्मात्यांनी या नेत्यांची मागणी मान्य केली असून, चित्रपटामधील असे सिन्स हटवले जातील. आज पुन्हा एकदा या चित्रपटाचे संकलन करून, नवीन व्हर्जन सिनेमाघरांत दाखवले जाईल.  अशी माहिती देण्यात आली आहे.

विजयची मुख्य भूमिका असलेला सरकार चित्रपट गत 6 नोव्हेंबरला प्रदर्शित झाला होता. दोन दिवसांतच या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्ती कमाई केली आहे.

 



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif