Mahesh Manjarekar: 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपट सोडण्याचं महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, रणदीप हुड्डावर केला 'हा' आरोप
वीर सावरकरांच्या चित्रपटाला जस्टिफाय केलं नाही तर तो चित्रपट का बनवायचा? त्यात जर रणदीप हुड्डा नसता तर मी उत्तम सिनेमा केला असता, असं विधान आता महेश मांजरेकर यांनी केले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) हा चित्रपट काही दिवसापुर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रणदीप हुड्डानं (Randeep Hooda) केलं आहे. त्यामुळे त्याचा हा चित्रपट काढण्यामागे प्रोपोगांडा असल्याचं देखील म्हटलं जात आहे. या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन रणदीप हुड्डानं (Randeep Hooda) केलं आहे. त्यामुळे त्याचा हा चित्रपट काढण्यामागे प्रोपोगांडा असल्याचं देखील म्हटलं जात होतं. दिग्दर्शक निर्माते महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी हा चित्रपट करण्याचं ठरवलं होतं, पण त्यांनी अर्ध्यातूनच हा सिनेमा सोडला. (हेही वाचा - Salman Khan Post After Firing Outside Galaxy Apartment: निवासस्थानाबाहेर गोळीबाराच्या घटनेनंतर सलमान खानने शेअर केला पहिला व्हिडिओ; पहा व्हिडिओ)
वीर सावरकरांच्या चित्रपटाला जस्टिफाय केलं नाही तर तो चित्रपट का बनवायचा? त्यात जर रणदीप हुड्डा नसता तर मी उत्तम सिनेमा केला असता, असं विधान आता महेश मांजरेकर यांनी केले आहे. महेश मांजरेकर यांनी नुकत्याच झालेल्या लोकसत्ता अड्डामध्ये या विषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, मला सावरकरांविषयी प्रचंड आकर्षण आहे. पण खरं सांगायचं तर ज्यांन हा सिनेमा केलाय, त्यांना त्याच्याशी काही घेणंदेणं नव्हतं. मला कायम वाटायचं की आपण सावरकरांवर चित्रपट करायला हवा.
या चित्रपटातील 70 टक्के स्क्रिप्ट हे माझं आहे. पहिल्या वाचनाला त्याने सांगितलं हे हवं आहे, ते हवं आहे. त्यानंतर तो हस्तक्षेप करु लागला. स्क्रिप्ट लॉक होईना, शूट थांबलं होतं. बजेट वाढू लागलं होतं. मला तर वाटलं की मी मरेन. कारण चित्रपट वाईट झाला तर लोक मला नावं ठेवतील. त्यानंतर इतकी नकारात्मक परिस्थिती निर्माण होऊ लागली की मी शेवटी निर्मात्यांना सांगितलं की, एकतर रणदीप हुड्डाला तो सिनेमा करु दे किंवा मी करतो. त्यानंतर तो दिग्दर्शनाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करु लागला.