धकधक गर्ल माधुरीचा निर्माता म्हणून दुसरा चित्रपट; 'पंचक' चित्रपटाच्या मुहूर्ताचा फोटो केला शेयर
माधुरीची मराठी चित्रपटातली दुसरी निर्मिती असलेल्या 'पंचक' या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळेचा फोटो माधुरीने इंस्टाग्रामवर शेयर केला आहे.
माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आता मराठी मध्ये तिचा दुसरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पंचक असे या चित्रपटाचे नाव असून, नुकताच माधुरीने सोशल मीडियावरती चित्रपटाच्या मुहूर्ताच्या वेळेचा फोटो शेयर केला आहे. श्रीराम नेने आणि माधुरी दोघांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन जयंत जठार यांनी केले आहे. कौटुंबिक विषय विनोदी पद्धतीने यात मांडण्यात आलेला आहे. आदिनाथ कोठारे (Adinath Kothare), तेजश्री प्रधान(Tejashree Pradhan) हे कलाकार मुख्य भूमिकेत असतील. तर आनंद इंगळे, भरती आचरेकर, सतीश अळेकर ही मंडळी सहाय्यक भूमिकेत असतील. तब्बल तीस वर्ष हिंदी चित्रपटांत काम केल्यानंतर मागच्या वर्षी माधुरीने बकेट लिस्ट या मराठी चित्रपटात पदार्पण करत प्रमुख भूमिका साकारली होती. त्याच्या चित्रीकरणाच्या वेळीच तिने मराठी चित्रपटाच्या निर्मितीचा निर्णय घेतला होता.
(हेही वाचा. Fatteshikast Trailer: शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीसह तलवारीने गाजवलेला पराक्रम दाखवणारा फत्तेशिकस्तचा तळपता ट्रेलर)
या आधी मार्च महिन्यात आलेला 15 ऑगस्ट हा तिचा निर्माता म्हणून पहिला चित्रपट होता. पण हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित न करता थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. पण नेटफ्लिक्स अजूनही भारतात सर्वसामान्य लोकांपर्यंत न पोचल्याने, बऱ्याच जणांना त्याचा आस्वाद घेता आला नव्हता.