...असे पडले लता मंगेशकर हे नाव !
पण त्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. जाणून घेऊया त्याबद्दल...
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर या यंदा 90 व्या वाढदिवस साजरा करत आहेत. लतादीदींचा आवाज आजही मंत्रमुग्ध करतो. पण इतके प्रचंड यश, नावलौकीक मिळवण्यामागे मेहनत तर होतीच. पण संघर्षही मोठा होता. फक्त गाण्यापुरतेच मर्यादीत न राहता त्यांनी विविध क्षेत्रातही काम केले आहे. पण त्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. तर लतादीदींच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याबद्दलच्या या खास गोष्टी...
# लतादीदींचे पूर्वीचे नाव हेमा असे होते. पण नंतर वडीलांच्या भावबंध नाटकातील लतिका पात्रावरुन प्रेरित होऊन त्यांचे नाव लता असे ठेवण्यात आले. त्याचबरोबर लतादीदींचे पूर्वीचे आडनाव हर्डीकर होते. पण ते मुळचे गोव्यातील मंगेशी येथील असल्याने त्यांच्या वडीलांनी दीनानाथांनी हर्डीकर बदलून मंगेशकर असे आडनाव लावायला सुरुवात केली. ...म्हणून लता मंगेशकरांच्या वडीलांनी केली होती दोन लग्नं !
# 1938 साली सोलापूर येथील नूतन थिएटरमध्ये लतादीदी पहिल्यांदा गायिका म्हणून लोकांसमोर आल्या. त्यावेळी त्यांनी राग खंबावती आणि दोन मराठी गाणी गायली.
# वयाच्या 5 व्या वर्षापासून त्यांनी वडीलांच्या संगीत नाटकात अभिनय करायला सुरुवात केली. त्याचबरोबर 1945 साली आलेल्या मास्टर विनायक यांच्या पहिल्या सिनेमात 'बडी माँ' या हिंदी सिनेमातही त्यांनी लहानशी भूमिका साकारली होती.
# लतादीदींच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी त्यांच्या फक्त एक दिवस शाळेत घालवला आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी त्या लहान बहिण आशा (आशाताई भोसले) यांना घेऊन शाळेत गेल्या आणि मुलींना जमवून गाणं शिकवू लागल्या. या सगळ्या प्रकाराबद्दल शाळेत बाईंचा ओरडा पडला आणि लतादीदींनी अगदी कायमचीच शाळा सोडली.
# 1942 साली आलेल्या 'किती हसाल' सिनेमात त्यांनी पहिले गाणे गायले. गाण्याचे बोल होते- 'नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी.' पण शेवटी ते गाणे सिनेमातून कट करण्यात आले. त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी 'पहिली मंगळागौर' सिनेमात 'नटली चैत्राची नवलाई' हे गाणे गायले आणि ते त्यांच्या करिअरमधील पहिले गाणे ठरले. ... म्हणून लता मंगेशकर आयुष्यभर अविवाहित राहिल्या
# 1948 साली आलेल्या शहीद सिनेमासाठी गात असताना निर्माते शशिधर मुखर्जी यांनी खूप बारीक आवाज म्हणून लतादीदींना नाकारले. पण त्यांच्या टॅलेंटवर विश्वास ठेवणाऱ्या गुलाब हैदर यांना लतादीदी गॉडफादर मानतात.
# करिअरच्या सुरुवातीला लतादीदी गायिका नूर जहाँन यांचे अनुकरण करत असल्याचे बोलले जात होते. मात्र कालांतराने त्यांनी स्वतःची शैली विकसित केली.
# 1949 साली आलेल्या महल सिनेमातील 'आयेगा आनेवाला' या गाण्याने लतादीदींना रातोरात स्टार सिंगर केले. अजूनही ते गाणे सर्वात कठीण गाण्यांपैकी एक मानले जाते.
# पूर्वी फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका/गायक अशी कॅटगरी नव्हती. पण लतादीदींच्या आवाज उठवल्यामुळे 1958 साली ती कॅटगरी सुरु करण्यात आली.
# 61 व्या वर्षी पार्श्वगायनासाठी नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळवून त्यांनी एक विक्रमच आपल्या नावे नोंदवला. हा पुरस्कार लेकीन (1990) या सिनेमातील गाण्यासाठी देण्यात आला होता.
# लता मंगेशकर यांच्यावर एका अज्ञान व्यक्तीने विषप्रयोग केला होता. त्यावेळेस त्या 3 महिन्यांसाठी अंथरुणाला खिळल्या होत्या. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावरही झाला होता विषप्रयोग
# 27 जानेवारी 1963 मध्ये लतादीदींनी गायलेले 'ए मेरे वतन के लोगो' हे गाणे ऐकून भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या डोळ्यांतून अश्रू आले होते.
# लतादीदींनी 1955 साली आलेल्या 'राम राम पाव्हन' या मराठी सिनेमासाठी पहिल्यांदा संगीतकार म्हणून काम पाहिले होते. त्याचबरोबर लतादीदी निर्मात्याही झाल्या. त्यांनी मराठी, हिंदीत अशा 4 सिनेमांची निर्मिती केली.
# मेकअप, ग्लॅमरपासून दूर राहणाऱ्या लतादीदींना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
# दिलीपकुमार यांच्यासाठी गाणे आणि के. ल. सैगल यांना भेटणे या दोन त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आहेत.
#लतादीदींनी आतापर्यंत 14 वेगवेगळ्या भाषांमध्ये साधारणपणे 50000 गाणी गायली आहेत.