बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) याचा मुलगा टायगर (Tiger Shroff) याने बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली आहे. परंतु जॅकी श्रॉफ याची मुलगी कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) हिने अद्याप बॉलिवूडमध्ये एन्ट्रीसुद्धा केली नाही आहे. मात्र तरीही कृष्णाचे आयुष्य एखाद्या ग्लॅमरस अभिनेत्रीसारखे आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील फोटो पाहिल्यास कृष्णा हिचा बोल्ड आणि हॉट लूक दिसून येत आहे. त्याचसोबत कृष्णा हिने नुकताच तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा बोल्ड अंदाजातील फोटो पोस्ट केला असून सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.
कृष्णा श्रॉफ हिने इन्स्टाग्रावर पोस्ट केलेल्या फोटोत समुद्रकिनारी तिच्या ब्रॉयफ्रेंडसोबत दिसून येत आहे. तर कृष्णा हिचा काळ्या रंगातील बिकनीतील बोल्ड लूकची चर्चा फार रंगली आहे. तर या दोघांच्या फोटोनंतर आता त्यांच्या चाहत्यांची संख्या अधिकच वाढली आहे.(टायगर श्रॉफ म्हणतो, दिशा पटानी ला डेट करण्याची माझी लायकी नाही, फॅनच्या प्रश्नाला Instagram स्टोरी मध्ये दिले उत्तर)
यापूर्वी सुद्धा कृष्णा हिने तिच्या ब्रॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर केला होता. मात्र कृष्णा तिच्या ब्रॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात कधी अडकणार याबर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. तर कृष्णा तिचा भाऊ टागर श्रॉफ एवढेची फिटनेस फ्रिक आहे. इन्स्टाग्रामवर कृष्णा सुद्धा फिटनेसबाबतचे व्हिडिओ पोस्ट करत असते. एवढेच नाही सोशल मीडियात कृष्णा हिचे फॅनफॉलोअर्स सुद्धा प्रचंड आहेत.