‘Bhool Bhulaiyaa 3’ Box Office: कार्तिक आर्यन स्टारर हॉरर-कॉमेडी भूल भुलैया 3 ची वीकेंडमधे मोठी कमाई; 185.92 कोटींचा टप्पा पार

2 नोव्हेंबर रोजी रिलीज झालेल्या भूल भुलैया 3 ने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. चित्रपटाने 185.92 कोटींचा टप्पा पार केला आहे.

‘Bhool Bhulaiyaa 3’ Box Office: कार्तिक आर्यन स्टारर हॉरर-कॉमेडी भूल भुलैया 3 ची वीकेंडमधे मोठी कमाई; 185.92 कोटींचा टप्पा पार
Photo Credit- X

‘Bhool Bhulaiyaa 3’ Box Office: दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या 'भूल भुलैया 3'ने बॉक्स ऑफिसवर पहिला वीकेंड धमाका केला आहे. चित्रपटाने या वर्षातील सर्वात मोठ्या ओपनींचा कारमाना केला आहे. याआधी तीन दिवसांच्या पहिल्या वीकेंडमध्ये हा विक्रम रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' आणि गेल्या वर्षी रिलीज झालेल्या विकी कौशलच्या 'सॅम बहादूर'च्या नावावर होता. 1 डिसेंबर 2023 रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटांने पहिल्या वीकेंडमध्ये देशात 185.92 कोटी टप्पा पार केला आहे.

150 कोटींच्या बजटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. या चित्रपटात माधुरी दीक्षित, विद्या बालन आणि तृप्ती दिमरी यांच्याही भूमिका आहेत. भूल भुलैया 2 च्या पहिल्या शनिवार आणि रविवारची आकडेवारी पाहता चित्रपटाने 55.96 कोटींची कमाई केली आहे.

कार्तिक आर्यनचे टॉप 5 ओपनिंग वीकेंड कमाई करणारे चित्रपट:

1. भूल भुलैया 3 - 110.20 कोटी

2. भूल भुलैया 2 - 55.96 कोटी रुपये

3. सत्यप्रेम की कथा - 37.35 कोटी

4. पति पत्नी और वो - 35.94 कोटी रुपये

5. लुका छुपी - 32.13 कोटी रुपये

(The above story first appeared on LatestLY on Nov 04, 2024 08:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).