करिना कपूर (Photo Credits: Instagram)

Kareena Kapoor Hot Video: कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन (Lock Down) घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या बॉलिवुड सेलिब्रेटी सोशल अकाऊंटवर आपल्या चाहत्यांच मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या सोशल मीडियावर बॉलिवुड अभिनेत्री करिना कपूरच्या (Kareena Kapoor) एका व्हिडिओने आग लावली आहे.

करिनाने आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी इन्स्टाग्रामवर एक जुना फोटो शुट व्हिडिओ शेअर केला आहे. करिनाने एका मॅगझीनसाठी हा फोटो शुट केला होता. या व्हिडिओमध्ये करिना वेगवेगळ्या कॉस्ट्यूम मध्ये दिसत आहे. करिनाचा हा हॉट अंदाज पाहून तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओला लाईक तसेच कमेंन्टस दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये करिना इरोटिक (Erotic) स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरस होत आहे. (वाचा - Coronavirus Lockdown काळात 'खिचडी' आणि 'साराभाई वर्सेस साराभाई' या कॉमेडी मालिका प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज; जाणून घ्या पुन:प्रसारणाच्या वेळा)

सध्या देशात लॉकडाऊन परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक कलाकारांनी स्वत: ला होम क्वारंटाईन करून घेतलं आहे. या काळात अनेक सेलिब्रेटी घरातील काम करतानाचे व्हिडिओ शेअर करत आहेत. तर काही कलाकारांनी या वेळाचा सदोपयोग करत जेवण बणवणं, भांडी घासणं, आदी घरकामे शिकून घेतली आहेत.