Kantara Chapter 1 : 'कांतारा चॅप्टर 1' च्या रिलीज डेटची घोषणा, 'या' दिवशी जगभरात सीक्वेल होणार प्रदर्शित
कांतारा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक याकडे डोळे लावून आहेत. आता कांताराचा सीक्लेल म्हणजे कांता चॅप्टर 1 चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.
Kantara Sequel Release Date Announced: अभिनेता आणि दिग्दर्शक रिषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) कांतारा चित्रपटाने प्रेक्षकांना एक अद्भुत जग दाखवलं. कांतारा चित्रपटाचा अनुभव प्रेक्षकांसाठी अविश्वसनीय ठरला. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अगदी कमी बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन आणि कलाकारांचा अभिनय यांचं प्रेक्षकांनी तोंड भरुन कौतुक केलं. 2022 साली आलेल्या कांतारा चित्रपटाच्या सीक्लेलची (Kantara Sequel) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. कांतारा चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षक याकडे डोळे लावून आहेत. आता कांताराचा सीक्लेल म्हणजे कांता चॅप्टर 1 चित्रपटाची (Kantara Chapter 1) रिलीज डेट समोर आली आहे.
अभिनेता-दिग्दर्शक रिषभ शेट्टीने कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. रिषभ शेट्टीने कांतारा चॅप्टर 1 चित्रपटाचं पोस्टर शेअर करत चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे. रिषभ शेट्टीने सोशल मीडियावर रिलीज डेटची घोषणा केली आहे. कांतारा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरल्यानंतर आता कांतारा चॅप्टर 1 बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड रचण्यासाठी सज्ज आहे. ('Kantara Chapter 1' First Look & Teaser Out: बहुप्रतिक्षित 'कंतारा - चॅप्टर 1'चा फर्स्ट लुक आणि धमाकेदार टीझर आऊट, ऋषभ शेट्टीची झलक पाहून चाहते तृप्त)
कांतारा चित्रपट 2022 मध्ये रिलीज झालेला हिट चित्रपट ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. कांतारा चित्रपटासाठी रिषभ शेट्टी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अवघ्या 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात 125 कोटींचा व्यवसाय केला, तर जगभरात 300 कोटींहून अधिक कमाई केली.
'कांतारा चॅप्टर 1' च्या रिलीज डेटची घोषणा
'कांतारा' चित्रपटामध्ये कर्नाटकातील प्रसिद्ध 'भूत कोला' उत्सवाची कथा दाखवण्यात आली होती, तर आता 'कांतारा : अध्याय 1' मध्ये कदंब कालावधीचा शोध घेतला जाईल. कदंब काळ हा भारतीय इतिहासाचा सुवर्णकाळ मानला जातो, जो त्याच्या आकर्षक समृद्धी आणि ऐतिहासिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये कदंब काळातील कथा पाहायला मिळणार आहे. 'कांतारा : चॅप्टर 1' 2 ऑक्टोबर 2025 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.