Kamal Kishore Mishra यांना दुसर्‍या मुलीसोबत रोमॅन्टिक अंदाजात रंगेहाथ पकडल्यानंतर पत्नीला गाडी खाली चिरडून मारण्याचा प्रयत्न; घटनेचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर पोलिसही शोधात

अनेकांनी मिश्रांवर टीका केली आहे. नेटकर्‍यांनी त्यांना कडक शासन व्हावं याची देखील मागणी केली आहे.

A screenshot of the CCTV footage of the incident, showing Yasmin Mishra's legs getting stuck under the front wheels of the car. (Photo Credit: ANI)

सिने निर्माते कमल किशोर मिश्रा (Kamal Kishore Mishra) यांच्याबाबतचा एका काळजात धस्स करणारा व्हिडिओ समोर आला आहे. कमल मिश्रा यांच्या पत्नीने केलेल्या आरोपानुसार, त्यांनी तिच्या अंगावर गाडी नेत जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे. गाडीने धक्का देत तिच्यावरून गाडी नेण्याचा देखील प्रयत्न झाला. यामध्ये सध्या पत्नी गंभीर रूपात जखमी झाली आहे. मुंबईच्या अंबोली पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. कमल मिश्रा यांच्या विरोधात आयपीसी 279 आणि 338 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पोलिसही याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

कमल किशोर मिश्रा यांच्या पत्नीच्या जबाबामध्ये दिलेल्या माहितीत, 19 ऑक्टोबरच्या दिवशी जेव्हा ती मिश्रांच्या घरी आली तेव्हा ते गाडीत दुसर्‍या महिलेसोबत बसले होते. तिच्यासोबत रोमॅन्टिक होत होते. हे पाहू मिश्रांच्या पत्नीने काचेवर टकटक करत काच खाली करण्यास सांगितले. आपल्याला बोलायचं आहे असेही सांगितलं पण त्यांनी काहीच ऐकून न घेता गाडी सुरू केली. थेट ही गाडी पत्नीच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मिसेस मिश्रांच्या डोक्याला,पायाला जबर जखम झाली आहे.

कमल किशोर मिश्रा यांचा अद्याप पत्नीच्या आरोपांवर आणि या प्रकरणाबाबत कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. कमल किशोर मिश्रा हे प्रसिद्ध निर्माते आहेत. भूतियापा, फ्लॅट नंबर 420, शर्मा जी की लग गई, देहाती डिस्को, खली बली यासारखे सिनेमे बनवले आहेत. 2019 मध्ये त्यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. नक्की वाचा: Chhattisgarh: पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अफेअर; पत्नीने मारहाण करत काढली नग्नावस्थेत धिंड, 4 जणांना अटक .

कमल मिश्रा यांचा व्हिडीओ सोशल मीडीयामध्ये चांगलाच वायरल झाला आहे. अनेकांनी मिश्रांवर टीका केली आहे. नेटकर्‍यांनी त्यांना कडक शासन व्हावं याची देखील मागणी केली आहे.