प्रायव्हेट फोटो लिक झाल्यानंतर कमल हासनच्या मुलीने मागितली मुंबई पोलिसांकडे मदत

साउथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार आणि राजनेता कमल हासन यांची लहान मुलगी अक्षरा हासनचा प्रायव्हेट फोटो 1 आठवड्यांपूर्वी लिक झाला होता

अक्षरा हासन (Photo Credits: Instagram)

साउथ फिल्म इंडस्ट्रीचे सुपरस्टार आणि राजनेता कमल हासन यांची लहान मुलगी अक्षरा हासनचा प्रायव्हेट फोटो 1 आठवड्यांपूर्वी लिक झाला होता. अक्षराचा हा फोटो अतिशय कमी कालावधीमध्ये सोशल मिडीयावरदेखील तुफान व्हायरल झाला होता. या फोटोमार्फत अक्षराचा धक्कादायक लुक लोकांच्या समोर आला होता. ज्यामुळे अक्षराला लोकांच्या निंदेचा सामना करावा लागला. सुरुवातीला अक्षराचा हा फोटो एडीट केला गेला असावा अशी शंका व्यक्त करण्यात आली होती. मात्र आता अक्षराने स्वतः ती सायबर क्राईमची शिकार झाली असल्याच कबुल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कोणीतरी हॅक करून अक्षराचा प्रायव्हेट फोटो व्हायरल केला होता. या घटनेमुळे धक्का पोहचलेल्या अक्षराने सोशल मिडीयावर आपला संताप व्यक्त केला आहे. अक्षराने या गोष्टीची तक्रार आता मुंबई पोलिसांकडे केली आहे. अक्षराने हकार्सला पकडून त्याला शिक्षा देण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे मदत मागितली आहे.

अक्षरा अभिनेत्री श्रुती हसनची बहिण असून, ती बच्चन और धनुष स्टारर फिल्म शमिताभमध्ये देखील दिसली होती. अशा प्रकारचे फोटोज लिक होणारी अक्षरा पहिली अभिनेत्री नाही. याआधीही एमी जॅक्सनचा फोन हॅक करून तिचे पर्सनल आणि प्रायव्हेट फोटोज लिक करण्यात आले होते.