IND vs PAK, ICC World Cup 2019: आपला बोल्ड फोटो शेअर करत Sunny Leone ने केले पावसाला दूर जाण्याचे आवाहन, (Photo)
यामध्ये तिने लख्ख सुर्यप्रकाशातील आपला बोल्ड फोटो शेअर करत
अखेर नाही होय करत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक सामना (ICC World Cup) सुरु झाला. पाकिस्तानने टॉस जिंकून पहिल्यांना फिल्डिंग घेतली. भारताच्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या खेळीने दमदार सुरुवात करत पाकिस्तानसमोर 336 धावांचे आव्हान उभे केले आहे. या सर्वांमध्ये पावसाचा लपंडाव चालूच होता. सामन्यादरम्यान दोनवेळा पावसाने हजेरी लावल्यामुळे ब्रेक घ्यावा लागला. आता इकडे पाकिस्तानने फलंदाजी सुरु केली आहे आणि दुसरीकडे सनी लियोन (Sunny Leone)चे या सामन्याबाबत एक ट्विट व्हायरल होत आहे.
भारत पाकिस्तान सामान्यदरम्यान चालू असलेल्या पावसाच्या खेळावर सनी लियोनने ट्विट केले आहे. यामध्ये तिने लख्ख सुर्यप्रकाशातील आपला बोल्ड फोटो शेअर करत, कोणाला सुर्याप्रकाश असलेला दिवस (Sunny Day) हवा आहे का? असा प्रश्न विचारला आहे. सोबत पावसाने परत जावे (GoAwayRains) हा हॅशटॅगही तिने वापरला आहे. (हेही वाचा: आपल्या कंडोम चे उदाहरण देत Durex Condoms ने वर्तवली भारत-पाक सामन्याची 'ही' भविष्यवाणी)
दरम्यान, सध्या इतक्या मोठ्या स्पर्धेदरम्यान चालू असलेल्या पावसाच्या फटका काही देशांना बसला आहे. भारताने विश्वचषकात दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांना हरवून झोकात सुरुवात केली आहे. भारताचा न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धचा तिसरा सामना पावसाने रद्द झाला. दुसरीकडे पाकिस्तानने विश्वचषकात चार सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एका सामन्यात विजय झाला आहे तर दोन सामन्यात पराभव झाला आणि एक सामना रद्द झाला.