Sushant Singh Rajput Death Probe: सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरीत करण्याबाबतची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने पुढे ढकलली

त्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती.

Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput ) आत्महत्याप्रकरणीच्या चौकशी आणि घडामोडींना वेग आला आहे. तसेच सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे सोपवण्यात यावी, अशा मागणींही जोर धरला आहे. दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्याबाबत समीत ठक्कर यांनी त्यांचे वकील रसपालसिंह रेणू यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, मुबंईत सोमवारी रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. ज्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधीश दिपंकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडणार होती.

अभिनेता सुशांत यांना मुंबईत राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली. दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी बिहार राज्यातील पाटण्यामधील राजीव नगर पोलीस स्थानकातत्याची प्रेयसी, अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली. सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यामुळे या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली आहे. रियाविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अंकिताने सत्याचा विजय होतो, अशा आशयाची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानंतर पोलिसांनी अंकिताचीही चौकशी केली आहे. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput Case: मुंबई पोलिसांचे स्पष्टीकरण 'सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी 25 फेब्रुवारीला कोणतीही लेखी तक्रार दिली नव्हती'

सुशांत सिंह राजपूत यांनी 14 जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर संपूर्ण सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती. सध्या सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूचा तापास करण्यासाठी बिहार पोलीसांचा एक पथक मुंबईत दाखल झाला आहे. 15 कोटी रुपये, क्रेडीट कार्ड, पीन नंबर गायब असल्याने सुशांतसिंहच्या वडिलांनी म्हटले होते. त्यानंतर मुंबई आलेल्या बिहार पोलिसांच्या टीमने सुशांतसिंह राजपूतच्या बँक खात्यांची चौकशी सुरु केली आहे.