Sex With 200 People: '200 लोकांसोबत ठेवले शारीरिक संबंध'; American Pie ची अभिनेत्री Jennifer Coolidge चा धक्कादायक खुलासा

याचे सर्व श्रेय ती चित्रपटातील तिचे पात्र ‘Stiffler’s Mom’ ला देते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी 'अमेरिकन पाय’ तेव्हा जगभरात 1800 कोटींहून अधिक कमाई केली होती.

Jennifer Coolidge )संग्रहित संपादित प्रतिमा)

'अमेरिकन पाय' (American Pie) हा चित्रपट 1999 मध्ये रिलीज झाला होता. संपूर्ण जगभरात या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. चित्रपटाच्या यशासोबतच त्यात काम करणारे कलाकारही प्रसिद्ध झाले. आता या चित्रपटामुळे अमेरिकन अभिनेत्री जेनिफर कूलिज (Jennifer Coolidge) इतकी लोकप्रिय झाली की, त्यानंतर तिने 200 लोकांशी शारीरिक संबंध (Sex) ठेवले. खुद्द अभिनेत्रीने एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. जेनिफर आता 60 वर्षांची आहे.

व्हरायटी मॅगझिनशी संवाद साधताना अभिनेत्री म्हणाली, 'जर अमेरिकन पाय’ चित्रपट हिट झाला नसता, तर मी 200 लोकांसोबत सेक्स करू शकले नसते.’ अभिनेत्रीने असेही सांगितले की, या चित्रपटामुळे जितकी ती प्रसिद्ध झाली नाही, त्यापेक्षा जास्त आत्मसमाधान तिला मिळाले. जेनिफर कूलिज 'अमेरिकन पाय' द्वारे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. तिने या चित्रपटात एका अशा महिलेची भूमिका साकारली होती, जी आपल्या मुलाच्या मित्रामागे वेडी झाली आहे व तिला कसेही करून या तरुणासोबत संबंध ठेवायचे आहेत.

हे पात्र साकारल्यानंतर आपली सेक्स लाईफ खऱ्या आयुष्यातही 'जंगली' झाली असे जेनिफरने सांगितले. याचे सर्व श्रेय ती चित्रपटातील तिचे पात्र ‘Stiffler’s Mom’ ला देते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी 'अमेरिकन पाय’ तेव्हा जगभरात 1800 कोटींहून अधिक कमाई केली होती. 'अमेरिकन पाय' 1999 मध्ये आला होता व या या चित्रपट मालिकेत एकूण 4 चित्रपट होते. (हेही वाचा: Canada: 'जोडीदाराच्या संमतीशिवाय Condom काढणे हा लैंगिक गुन्हा'; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)

यानंतर जेनिफरला इतर अनेक चित्रपटांमध्ये अशाच प्रकारच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. अभिनेत्री म्हणाली की, या चित्रपटनंतर तिने चांगले मित्र बनवले. सध्या ती तिच्या एका मालिकेच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जेनिफरने हे देखील उघड केले की, तिला जवळजवळ 10 वर्षे ऑडिशनमध्ये नकारांचा सामना करावा लागला होता, ज्यामुळे तिला भीती वाटणे बंद झाले, कारण तिच्याकडे गमावण्यासारखे काहीच नव्हते. जेव्हा त्याला 'अमेरिकन पाय’ साठी कास्ट करण्यात आले तेव्हा तिचे आयुष्य कायमचे बदलले. ती 2021 मध्ये 'द व्हाईट हाऊस' या मालिकेत दिसली होती.