IPL Auction 2025 Live

Russia Ukraine War: युक्रेनमध्ये रशियन बॉम्बचा पाऊस; तरीही 'हा' ऑस्कर विजेता अभिनेता जीवाची बाजी लावत करत आहे डॉक्युमेंट्री शूट

ज्याची निर्मिती व्हाइस स्टुडिओ करत आहे.

Sean Penn (PC- Instagram)

Russia Ukraine War: सध्या सर्व जगाच्या नजरा युक्रेन-रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धावर आहेत. रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमधील लोक जीव वाचवण्यासाठी लवकरात लवकर देश सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता शॉन पेन (Sean Penn) युक्रेनमध्ये आहे. तो तिथे त्याच्या डॉक्युमेंट्रीवर काम करत आहे.

या माहितीपटात शॉन पेन रशियाच्या आक्रमणाविषयी सांगणार आहे. गुरुवारी, राष्ट्रपती कार्यालयाने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की शॉन पेन पत्रकार परिषदेला उपस्थित होते. त्यांनी उपपंतप्रधान इरिना वेरेश्चुक यांची भेट घेतली. त्यांनी पत्रकार आणि लष्करी कर्मचाऱ्यांशी रशियन हल्ल्याबद्दल वक्तव्य केलं. (वाचा - Russia-Ukraine युद्धासंदर्भात मिम्स शेअर केल्याने अभिनेता अरशद वारसी फसला, सोशल मीडियात होतोय ट्रोल)

शॉन पेन गेल्या नोव्हेंबरमध्ये त्यांच्या प्रकल्पासंदर्भात युक्रेनमध्ये होते. ज्याची निर्मिती व्हाइस स्टुडिओ करत आहे. त्यावेळी शॉन पेनने Donetsk जवळील युक्रेनियन सशस्त्र दलाच्या फ्रंटलाइनला भेट दिली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by jorge hdz (@cinexprex)

ऑस्कर विजेते शॉन पेन गेल्या अनेक वर्षांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय मानवतावादी आणि युद्धविरोधी प्रयत्नांमध्ये सामील आहेत. 2010 मध्ये हैती भूकंपानंतर, शॉनने नॉन प्रॉफिट डिजास्टर रिलीज ऑर्गनाइजेशनची स्थापन केली. Citizen Penn डॉक्यूमेंट्रीमध्ये यासंदर्भात सांगण्यात आलं आहे. शॉन एक अमेरिकन अभिनेता, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता आहे. तो दोन अकादमी पुरस्कारांचा विजेता आहे. जो त्याला मिस्ट्री ड्रामा Mystic River आणि बायोपिक देण्यात आला आहे.