Mr. Bean फेम अभिनेता Rowan Atkinson यांचा मोठा खुलासा- 'यापुढे कधीच साकारणार नाही मिस्टर बीनची भूमिका', जाणून घ्या कारण

मात्र या व्यक्तिरेखेवर आधारित अ‍ॅनिमेटेड मालिकेत ते नक्कीच आपला आवाज देतील

Mr. Bean fame Rowan Atkinson (Photo Credits: Instagram)

‘मिस्टर बीन’ (Mr. Bean) ही इंग्रजी भाषेतील एक लोकप्रिय विनोदी मालिका, ज्याचे चाहते संपूर्ण जगभर पसरलेले आहेत. या मालिकेमुळे ‘मिस्टर बीन’ हे पात्र व ही भूमिका साकारणारे ब्रिटिश अभिनेते रोवन अ‍ॅटकिन्सन (Rowan Atkinson) रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आले. रोवन यांनी बरेच चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे परंतु तरीही ‘मिस्टर बीन’ म्हणूनच जगभरात ते ओळखले जातात. आज रोवन अ‍ॅटकिन्सन आपला 66 वा वाढदिवस साजरा करीत आहेत. आपल्या वाढदिवसादिवशी रोवन यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. ते म्हणाले आहेत की, आता इथून पुढे ते कधीही ‘मिस्टर बीन’ची भूमिका साकारणार नाहीत.

रोवन अ‍ॅटकिन्सन यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ते त्यांना आता ‘मिस्टर बीन’ची भूमिका साकारण्यात रस नाही. मात्र या व्यक्तिरेखेवर आधारित अ‍ॅनिमेटेड मालिकेत ते नक्कीच आपला आवाज देतील असे त्यांनी निश्चितपणे सांगितले. रोवन म्हणाले, 'केवळ आवाजाच्या माध्यमातून ही भूमिका साकारणे माझ्यासाठी सोपे आहे. मात्र यापुढे हे पात्र पडद्यावर साकारण्यात आनंद नाही. हे पात्र साकारण्यासाठी जी जबाबदारी घ्यावी लागते ती खूप मोठी आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘हे पात्र साकारणे खूप तणावपूर्ण आणि कंटाळवाणे आहे. हावभावाच्या माध्यमातून लोकांना सतत हसत ठेवणे या गोष्टीचे नेहमीच माझ्यावर दडपण असते. म्हणूनच आता इथेच थांबणे गरजेचे आहे.’ (हेही वाचा: Wonder Woman फेम हॉलिवूड अभिनेत्री Gal Gadot हिने व्यक्त केली शाहीन बाग आंदोलनातील 'बिलकिस बानो' यांना भेटण्याची इच्छा)

दरम्यान, ‘मिस्टर बीन’ हा कार्यक्रम 1990 ते 1995 दरम्यान प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर या पात्रावर 2 चित्रपटही प्रदर्शित झाले होते. या पात्राच्या लोकप्रियतेच अंदाज यावरून लावता येऊ शकतो की, मिस्टर बीनचे फेसबुक पेज जगभरातील सर्वाधिक पसंत केलेल्या पेजमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. दरम्यान, अ‍ॅटकिन्सन सर्वात आधी 1979-1982 दरम्यान Not the Nine O'Clock News या कॉमेडी शोमध्ये दिसून आले होते. आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी 20 चित्रपट, 1 दूरदर्शन चित्रपट, 33 दूरदर्शन मालिका 33 आणि 9 जाहिरातींमध्ये भूमिका साकारल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif