Justin Bieber India Show: पाच वर्षांनंतर भारतामध्ये परफॉर्म करणार जस्टिन बीबर; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार कार्यक्रम

जस्टिन बीबर 2017 मध्ये भारतात आला तेव्हा तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. लोकांनी भरमसाठ पैसे देऊन त्याच्या शोची तिकिटे खरेदी केली होती. मात्र कॉन्सर्टमध्ये जस्टिन बीबरने गाणे गायले नसल्याचा दावा करण्यात आला होता

Justin Bieber India Show: पाच वर्षांनंतर भारतामध्ये परफॉर्म करणार जस्टिन बीबर; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार कार्यक्रम
Justin Bieber (Photo Credits: Instagram)

युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि हॉलिवूडचा सर्वात मोठा पॉप गायक जस्टिन बीबर (Justin Bieber) पुन्हा एकदा भारतात येणार आहे. यावेळी जस्टिन बीबरचा शो देशाच्या राजधानीत दिल्लीत (Delhi) होणार आहे. साधारण 5 वर्षांपूर्वी, 2017 मध्ये जस्टिन बीबरने भारतात त्याचा शो केला होता, जिथे त्याला पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी लाखो लोक पोहोचले होते. आता जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबरचा शो भारतात पुन्हा होणार असल्याने जस्टिनच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.

जस्टिन बीबर हा एक लोकप्रिय गायक असून त्याचे भारतातही लाखो चाहते आहेत. आता जस्टिन 2017 नंतर भारतामध्ये त्याचा शो करणार आहे. इतकी वर्षे त्याचे चाहते त्याच्या कॉन्सर्टची वाट पाहत होते आणि आता ही प्रतीक्षा संपली आहे. जस्टिन बीबर त्याच्या आगामी अल्बम ‘जस्टिस’च्या प्रमोशनसाठी विविध देशांच्या दौऱ्यावर आहे. यादरम्यान, तो भारतात त्याच्या नवीन अल्बमचे प्रमोशन करताना दिसणार आहे.

तो राजधानी दिल्लीतील एका कार्यक्रमात परफॉर्म करणार आहे. दिल्लीत 18 ऑक्टोबरला जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा कॉन्सर्ट होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जस्टिन बीबर या कॉन्सर्टमध्ये सुमारे 30 मिनिटे परफॉर्म करणार आहे, जे चाहत्यांसाठी एखाद्या गिफ्टपेक्षा कमी नाही. जस्टिन बीबरच्या या कार्यक्रमाच्या तिकिटांचे आगाऊ बुकिंगही लवकरच सुरू होणार आहे. माहितीनुसार, लोक 4 जूनपासून या कार्यक्रमासाठी ऑनलाइन तिकीट बुक करू शकतात.

जस्टिन बीबर 30 देशांमध्ये जाऊन आपल्या अल्बमचे प्रमोशन करणार आहे. मे 2022 ते मार्च 2023 पर्यंत तो 125 हून अधिक शो करणार आहे. 2016-2017 मधील ‘पर्पज वर्ल्ड टूर’नंतरची बीबरची ही पहिलीच वर्ल्ड टूर आहे. (हेही वाचा: 'महाभारत आणि वेदांवरून प्रेरणा घेऊन बनवला 'Avengers'; हनुमानाची कॉपी आहे Thor आणि कर्णावरून घेतला आयर्न मॅन'- Kangana Ranaut)

दरम्यान, जस्टिन बीबर 2017 मध्ये भारतात आला तेव्हा तो वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. लोकांनी भरमसाठ पैसे देऊन त्याच्या शोची तिकिटे खरेदी केली होती. मात्र कॉन्सर्टमध्ये जस्टिन बीबरने गाणे गायले नसल्याचा दावा करण्यात आला होता.  त्याने फक्त लिपसिंक केले होते, ज्यानंतर लोकांनी त्याची खिल्ली उडवली. सोनाली बेंद्रे आणि बिपाशा बसू सारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनीही बीबर कॉन्सर्ट पाहिल्यानंतर सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली होती. या सर्व कारणांमुळे आपल्या शोनंतर त्याने ताजमहाल आणि राजस्थानला जाण्याचा बेतही सोडून दिला आणि मुंबईहून थेट आपल्या देशात परतला.

(The above story first appeared on LatestLY on May 24, 2022 06:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).