Shakira's Statue In Belly-Dancing Pose: बेली-डान्सिंग पोझमध्ये उभारला गायिका शकीरा हिचा पुतळा

Shakira's Statue in Her Hometown of Barranquilla: ग्रॅमी-विजेत्या कोलंबियन गायिका शकीरा हिचे मूळ गाव बॅरनक्विला येथे तिचा पुतळा उभारण्यात आला आहे. बेली-डान्सिंग ( Shakira Belly Dancing) पोझमध्ये 6.5-मीटर (21-फूट) उंचीचा कांस्य पुतळ्याच्या अनेकांचे लक्ष्य वेधून घेतो आहे.

Shakira - Belly Dance | (Photo Credits: X)

Shakira's Statue in Her Hometown of Barranquilla: ग्रॅमी-विजेत्या कोलंबियन गायिका शकीरा हिचे मूळ गाव बॅरनक्विला येथे तिचा पुतळा उभारण्यात आला आहे. बेली-डान्सिंग ( Shakira Belly Dancing) पोझमध्ये 6.5-मीटर (21-फूट) उंचीचा कांस्य पुतळ्याच्या अनेकांचे लक्ष्य वेधून घेतो आहे. मेयर जैमे पुमारेजो यांनी मॅग्डालेना नदीकाठी एका उद्यानात, शकीराची प्रसिद्ध बेली-डान्सिंग पोझ कॅप्चर करून हे स्मारक शिल्प स्थानिकांच्या सहभागातून उभारले. या वेळी शकीराचे पालक आणि चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शकीरा ही पॉप गायक आहे. तिची गाणी जगभरात ऐकली जातात. परिणामी तिसुद्धा प्रचंड प्रसिद्ध आहे.

यिनो मार्केझ यांनी बनवला पुतळा

कलाकार यिनो मार्केझ यांनी बनवलेल्या या पुतळ्यामध्ये शकीरा तिच्या लांब, कुरळ्या केसांसह ओव्हरहेडसह बेली डान्स करत आहे. अॅल्युमिनीयमच्या चमकदार स्कर्टमध्ये डान्स पोझमध्ये शकीरा खूपच सुंदर दिसते आहे. महापौर पुमरेजो यांनी पुतळ्याचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले ही, हा पुतळा अत्यंत महत्त्वाचा आहे. जो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरेल. हा पुतळ्याकडे पाहून कोणीही प्रेरणा घेऊ शकतात. आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी हा पतळा अनेकांना प्रेरणा देईल, असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Waaka Waaka म्हणणारी शकिरा जेव्हा 'आनंदी गोपाळ'च्या 'वाटा वाटा' गाण्यावर थिरकते, सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल)

व्हिडिओ

महापौर कार्यालयाकडून निवेदन

शकीराच्या पुतळ्याशेजारी एक फलकही लावण्यात आला आहे. जो तिच्या कर्तृत्वाची प्रशंसा करतो. तसेच, लॅटिन ग्रॅमी पुरस्कार आणि तिने तिच्या बालपणापासून आतापर्यंत केलेल्या स्थानिक ते आंतरराष्ट्रीय कामगिरीचा आढावा या फलकात घेतल्याचे पाहायला मिळते. महापौर कार्यालयाच्या एका निवेदनात म्हटले आहे की, मियामीमध्ये राहणाऱ्या शकीरा यांनी पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी आनंद व्यक्त केल्याचे म्हटले आहे. तसेच तिचे कायमचे घर बॅरनक्विला असेल असेही म्हटले आहे. (हेही वाचा, Shakira and Gerard Pique Breakup: 12 वर्षांच्या एकत्र सहवासानंतर शकीरा-जेरार्ड पिकचा ब्रेकअप; लग्नाशिवाय आहेत 2 मुलं)

एक्स पोस्ट

कोण आहे शकीरा?

शकीरा इसाबेल मेबारक रिपोल ही कोलंबियन गायिका आहे. बॅरँक्विला येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या, तिने वयाच्या 13 व्या वर्षी सोनी म्युझिक कोलंबिया मधून रेकॉर्डिंगमध्ये पदार्पण केले. मॅजिया (1991) आणि पेलिग्रो (1993) या तिच्या पहिल्या दोन अल्बमला फारसे व्यावसायिक यश लाभले नाही. मात्र, अल्पावधीतच ती हिस्पॅनिक देशांमध्ये प्रसिद्ध झाली. तिचे पुढील अल्बम, पाईस डेस्काल्झोस (1995) आणि डोंडे एस्तन लॉस लॅड्रोन्स (1998) चांगलेच गाजले. तिने तिच्या पाचव्या अल्बम लाँड्री सर्व्हिस (2001) सह इंग्रजी भाषेच्या बाजारपेठेत प्रवेश केला. या अल्बमच्या जगभरात 13 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या. Waka Waka (This Time for Africa) या गाण्याने तिला जगभरात प्रसिद्धी मिळवून दिली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now