हॉलिवूडने कॉपी केले आहेत हे भारतीय चित्रपट
आपल्यापैकी प्रत्येकानेच हॉलिवूडमधून पूर्णतः हिंदीत कॉपी झालेले, अथवा विविध भाषांमधील चित्रपटांवरून प्रेरणा घेऊन भारतीय भाषांमध्ये बनलेले चित्रपट पहिले असतीत. मात्र तुम्हाला हे माहित आहे की, हॉलिवूडमध्येही असे अनेक चित्रपट बनलेले आहेत ज्यांचे मूळ स्त्रोत आहेत आपले भारतीय चित्रपट. ऐकून नवल वाटले ना? चला तर पाहूया हॉलिवूडचे असे कोणते चित्रपट आहेत जे आधारीत आहेत भारतीय चित्रपटांवर
१) ए कॉमन मॅन – ए वेडन्सडे
ए वेडन्सडे २००८ साली प्रदर्शित झाला. याच चित्रपटावर आधारीत चंद्रन रुतनाम याने अकादमी पुरस्कार विजेता बेन किंग्सले याला घेऊन ए कॉमन मॅन बनवला. किंग्सले याने ए वेडन्सडे मधील नसरुद्धीन शहाची भूमिका साकारली होती. फक्त प्रेरणा घेऊनच नाही, तर ए कॉमन मॅन हा नीरज पांडेच्या ए वेडन्सडेचा ऑफिशियल इंग्लिश रिमेक होता.
२) डिलिव्हरी मॅन – विकी डोनर
व्हिन्स वॉनच्या स्पर्म डोनेट मधून ५३३ मुलांचा जन्म, तर आयुष्यमानच्या स्पर्म मधून ५३ मुलांचा जन्म इतका फरक सोडला तर डिलिव्हरी मॅनची पूर्ण कथा आधारीत होती सुजित सरकारच्या विकी डोनरवर.
३) फिअर – डर
जेम्स फॉलेचा अमेरिकन थ्रिलर १९९६ साली प्रदर्शित झाला. चित्रपटांमधील नावे आणि प्रेमाचा त्रिकोण या गोष्टी वगळल्या तर संपूर्ण चित्रपट बेतलेला होता १९९३मध्ये गाजलेला हिंदी चित्रपट डर यावर. त्याकाळी हा चित्रपट तब्बल १५८४ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता, आणि चित्रपटाच्या बजेटपेक्षा तीन पट जास्त कमाई या चित्रपटाने केली होती.
४) विन ए डेट विथ टॅड हॅमिल्टन – रंगीला
जितका टपोरी मित्र अमीर खानने रंगवला तितका टॉपर ग्रेसने रंगवला नसला तरी, चित्रपटाचा मूळ गाभा म्हणजेच एका बाजूला मित्र आणि दुसऱ्या बाजूला एक फिल्मस्टार हा हिंदीमधील रंगीलावरूनच घेतला होता. या इंग्लिश चित्रपटासाठी तब्बल १६ गाणी रेकॉर्ड करण्यात आली होती. त्यावेळच्या नॉर्थ अमेरिकन बॉक्स ऑफिसवर हा ३ऱ्या क्रमांकाचा सुपरहीट चित्रपट ठरला होता.
५) किल बिल – अभय
चित्रपटाचा प्लॉट थोडासा वेगळा असला तरी क्विन्टीन टारेंटिनो यांनी त्यांच्या किल बिल मधील अनेक सीन्स हे सुरेश कृष्ण यांच्या २००१च्या अभय वरून घेतले असल्याचे सांगितले आहे. हिंदीमधील अभय हा तमिळ आलावंदन याचा रिमेक होता. दोन्हीही चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत कमल हसन हेच आहेत.
६) पर्ल हार्बर – संगम
पर्ल हार्बर हा चित्रपट बंदरापेक्षा त्याचीत प्रेम त्रिकोनामुळेच फार गाजला. या चित्रपटाचा मूळ प्लॉट आधारीत होता सुपरहिट हिंदी चित्रपट संगम वर. फरक एवढाच की, संगममध्ये फक्त एकच मित्र पायलट असतो तर पर्ल हार्बरमध्ये दोन्हीही मित्र पायलट असतात.
७) लीप इयर – जब वी मेट
चित्रपटाच्या निर्मात्यांनी जरी लीप इयर हा जब वी मेटवर आधारीत नसल्याचे सांगितले असले तरी, दोन्ही चित्रपटांची कथा ही एकच आहे यावरूनच तुम्ही अंदाज करू शकता. जब वी मेट जितका गाजला तितका लीप इयर लोकप्रिय ठरला नसला तरी तब्बल १३२ समीक्षकांनी या चित्रपटाला सकारात्मक रिव्ह्यूज दिले होते.
८) हिच – छोटी सी बात
आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की हिंदी चित्रपट पार्टनर हा हिच या इंग्लिश चित्रपटावर आधारीत आहे, मात्र तुम्हाला हे वाचून नवल वाटेल की हिच हाच चित्रपट आधारीत आहे हिंदी चित्रपट छोटी सी बातवर.
९) डिव्होर्स इंव्हीटेशन – आहवानाम
१९९७ सालचा एस.व्ही. कृष्णा यांचा अतिशय लोकप्रिय तेलुगु चित्रपट आहावानाम यावर डिव्होर्स इंव्हीटेशन आधारीत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा इंग्लिश चित्रपट स्वतः एस.व्ही.कृष्णा यांनीच दिग्दर्शित केला आहे.
१०) द डर्टी डझन – दो आँँखे बाराह हाथ
व्ही. शांताराम यांचा १९५७ सालचा दो आँँखे बाराह हाथ हा चित्रपट खूपच गाजला होता, तुरुंगातील १२ कैद्यांना सुधारून त्यांना नवीन जीवन प्रदान करणे ही या चित्रपटाची कथा होती. याच कथेवर १९६७ साली दिग्दर्शक रॉबर्ट अॅलड्रिच याने द डर्टी डझन हा चित्रपट बनवला. हा इंग्लिश चित्रपट त्यावेळी इतका लोकप्रिय झाला होता की दिग्दर्शकाला या चित्रपटाचा दुसरा भाग देखील काढावा लागला. तसेच या चित्रपटावर अनके टीव्ही सिरीज देखील बनल्या होत्या. इटालियन चित्रपट द इनग्लोरिअस बास्टर्डस हा या इंग्लिश चित्रपटाचा रिमेक होता.