Friends: The Reunion: फ्रेंड्स: द रीयूनियनला भारतातील प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद; काही तासांतच मिळाले 10 लाखांहून Views
या शो चा पहिला पार्ट अत्यंत हिट ठरला. त्यामुळे प्रेक्षक दुसऱ्या पार्टची अगदी आतुरतेने वाट पाहत होते.
Friends: The Reunion: अमेरिकेतील टीव्ही शो 'फ्रेंड्स: द रीयूनियन' गुरुवारी रिलीज करण्यात आला. या शो चा पहिला पार्ट अत्यंत हिट ठरला. त्यामुळे प्रेक्षक दुसऱ्या पार्टची अगदी आतुरतेने वाट पाहत होते. केवळ परदेशातच नाही तर भारतात देखील या शोची प्रचंड क्रेझ आहे. दरम्यान, हा शो रिलीज होताच भारतातून त्याला उदंड प्रतिसाद मिळाल्याची बातमी समोर येत आहे. शो रिलीज होताच केवळ 8-9 तासांतच याला 10 लाखांहून अधिक व्हुज मिळाले.
झी वर रिलीज करण्यात आलेल्या या शो बद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्यामुळे झी5 (Zee5) वर शो रिलीज होताच त्यावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्या. त्याचबरोबर शो पाहिल्यानंतरही प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत. रिपोर्टनुसार, भारतात या शो ला तुफान प्रतिसाद मिळत असून याची व्हुअरशीप वेगाने वाढत आहे. (Friends: The Reunion Time and Date: मोठी बातमी! भारतामध्ये Zee5 वर प्रसारित होणार 'फ्रेंड्स: द रीयूनियन'; जाणून कधी व कसे पाहू शकाल)
'फ्रेंड्स: द रीयूनियन' शो चा रनटाईम 104 मिनिटांचा असून यात जेनिफर एनिस्टन, कर्टेनी कॉक्स, लिसा कुड्रो, मैट लेब्लांक, मैथ्यू पेरी आणि डेविड श्विमर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याचबरोबर जस्टिन बीबर, बीटीएस, जेम्स कॉर्डन, लेडी गागा, टॉम सेलेक, जेम्स मायकल टायलर, मॅगी व्हीलर, रीज विदरस्पून आणि मलाला यूसुफजई यांसारख्या जगप्रसिद्ध कलाकारांनी शो मध्ये पाहुणे कलाकार म्हणून वर्णी लावली आहे. दरम्यान, येत्या विकेंडला शो ला विक्रमी यश मिळण्याची अपेक्षा आहे.