Mr Bean ची भूमिका साकारणारा अभिनेता Rowan Atkinson चा मृत्यू; सोशल मिडीयावर पसरली अफवा, जाणून घ्या सत्य
मात्र, या व्यक्तिरेखेवर बनत असलेल्या अॅनिमेशन मालिकेसाठी आपण आपला आवाज देणार असल्याचेही त्याने सांगितले होते
स्टार ब्रिटीश अभिनेता रोवन ऍटकिन्सन (Rowan Atkinson) याने 90 च्या दशकात टेलिव्हिजनवर मिस्टर बीनची (Mr Bean) भूमिका साकारून इतिहास घडवला होता. आपल्या चित्रपटांमध्ये एकही शब्द न बोलता रोवनने सगळ्यांना खळखळून हसवले होते. आता सोशल मिडियावर रोवन ऍटकिन्सनच्या मृत्यूची बातमी (Rowan Atkinson Death News) व्हायरल झाली आहे. प्रत्येकजण रोवन ऍटकिन्सनबद्दल एकच प्रश्न विचारत आहे की, रोवनचा खरच मृत्यू झाला आहे? रोवन ऍटकिन्स्टनच्या मृत्यूच्या वृत्ताने सोशल मीडियावर जोर धरला होता. परंतु सत्य हे आहे की या केवळ अफवा आहेत.
जॉनी इंग्लिश आणि मिस्टर बीन सारखी पात्रे साकारणारा 66 वर्षीय रोवन ऍटकिन्सन जिवंत आहे. रोवन ऍटकिन्सन यांचे निधन झाल्याची अफवा कालपासून ट्विटरवर पसरली होती. अनेकांनी RIP Mr Bean असे लिहित ट्वीट करायला सुरुवात केली होती. पण, आता माहिती मिळत आहे की, मिस्टर बीन पूर्णपणे बरे आणि निरोगी आहेत. रोवन ऍटकिन्सनबद्दल अशा खोट्या बातम्या व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही रोवनच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या.
स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, फॉक्स न्यूज नावाच्या ट्विटर हँडलवरून रोवन ऍटकिन्सनच्या मृत्यूची अफवा पसरवली गेली. फॉक्स न्यूज नावाचे हे ट्विटर हँडल आपण अमेरिकन न्यूज चॅनल असल्याचे सांगत होते. या ट्विटमध्ये लिहिले होते- 'Fox breaking, Mr Bean (Rowan Atkinson) यांचे कार अपघातात निधन.’ परंतु ते खोटे ट्विटर हँडल होते. त्यांनी शेअर केलेली लिंक स्पॅम होती. म्हणजे मुद्दाम लोकांनी त्या लिंकवर क्लिक करावे म्हणून रोवन ऍटकिन्सनच्या मृत्यूची अफवा पसरवली गेली. या लिंकवर क्लिक करणारे अनेक लोक स्पॅमचे बळी ठरले. (हेही वाचा: लोकप्रिय हॉलीवूड अभिनेता Paul Rudd ठरला यंदाचा जगातील सर्वात 'सेक्सी पुरुष'; Marvel च्या अनेक चित्रपटांमध्ये साकारली आहे भूमिका)
दरम्यान, या वर्षी जानेवारीमध्ये रोवन ऍटकिन्सनने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो यापुढे मिस्टर बीनची भूमिका करणार नाही. मात्र, या व्यक्तिरेखेवर बनत असलेल्या अॅनिमेशन मालिकेसाठी आपण आपला आवाज देणार असल्याचेही त्याने सांगितले होते. रोवन म्हणाला की, मिस्टर बीनच्या व्यक्तिरेखेची जबाबदारी खूप मोठी आहे, परंतु आता त्याला हे पात्र साकारण्यात मजा येत नाही.