Happy Birthday Asha Bhosle: नाच रे मोरा... ते दिल चीझ क्या है.. अष्टपैलू गायिका आशा भोसले यांच्या 'या' एव्हरग्रीन गाण्यांची जादू आजही रसिकांवर कायम!
महाराष्ट्राच्या सांगली गावात जन्म झालेल्या आशा भोसले यांनी आज त्यांच्या जादुई आवाजाने जगाला भूरळ पाडली आहे.
Asha Bhosle 86th Birthday: प्रसिद्ध गायिका आशा भोसले आज त्यांचा 86 वा वाढदिवस साजरा करत आहे. महाराष्ट्राच्या सांगली गावात जन्म झालेल्या आशा भोसले यांनी आज त्यांच्या जादुई आवाजाने जगाला भूरळ पाडली आहे. दीनानाथ मंगेशकरांची कन्या आणि लता मंगेशकरांची बहीण आशा भोसले या जगभरात एक अष्टपैलू गायिका म्हणून ओळखल्या जातात. संगीताचे अनेक प्रकार आणि भारतातील विभिन्न भाषा यांमधून गायनसेवा करणार्या आशा भोसले यांच्या नावावर जगभरात संगीत क्षेत्रातील अनेक मानाचे विक्रम नोंदवण्यात आले आहेत. ग्रॅमी अवॉर्ड साठी नामांकित झालेल्या आशा भोसले या पहिल्या भारतीय गायिका आहेत. 1997 आणि 2005 साली ग्रॅमी अवॉर्ड साठी नामांकन मिळाले आहे. जगभरात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचा विक्रमही आशा भोसले यांच्या नावावर आहे. त्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड मध्ये त्यांचे नाव 2011 साली नोंदवण्यात आले आहे. आशा भोसले यांनी दिग्दर्शित केला अविनाश गोवारीकर यांच्या 'पानिपत' सिनेमातील एक सीन
वडील दीनानाथ मंगेशकरांच्या निधनानंतर वयाच्या 9 वर्षापासून त्यांनी गायनाला सुरूवात केली. मराठी सिनेमा माझा बाळ पासून सुरूवात केली. आजही त्यांच्या आवाजाची जादू रसिकांवर कायम आहे. नाईटिंगेल ऑफ एशिया, बी.बी.सी.आकाशवाणीच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार, भारताचा मानाचा पद्मविभुषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मग आजही तरूणांना लाजवेल अशा उत्साह असणार्या आणि मधाळ आवाजाच्या आशा भोसलेंची ही काही एव्हरग्रीन गाणी
तरूण आहे रात अजूनी
नाच रे मोरा
दिल चीझ क्या है
मेरा कुछ समान
आशा भोसले यांचे सांगितिक आणि वैयक्तित आयुष्य यांच्यामध्ये अनेक चढ- उतार आले. मात्र या सार्यांवर मात करून आज आशा भोसले पुन्हा तितक्याच उमेदीने सार्यांसोबत वावरतात. संगीतातील अनेक रिअॅलिटी शोजमध्ये त्यांची हजेरी असते, त्याच्या माध्यमातून आशा भोसले नव गायकांना सल्ला देतात.