Majhya Navryachi Bayko: 'झी मराठी'वरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' घेणार प्रेक्षकांचा निरोप; आता 'ही' नवी मालिका करणार सर्वांचे मनोरंजन
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझा नवऱ्याची बायको' (Mazya Navraychi Bayko) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. मात्र, येत्या 7 मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत होणार आहे.
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझा नवऱ्याची बायको' (Mazya Navraychi Bayko) लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती. मात्र, येत्या 7 मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत होणार आहे. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका बंद होणार असली तरी त्याऐवजी दुसरी नवी मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘घेतला वसा टाकू नका’ (Ghetala Vasa Taku Nako) ही नवी मालिका झी मराठीवर सुरू होणार आहे. यामध्ये पौराणिक कथा वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. भगरे गुरूजी ही कथा मांडणार आहेत. झी मराठीवर येणारी ही नवी मालिका प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवर या मालिकेचा पहिला भाग 22 ऑगस्ट 2016 रोजी प्रसारित झाला होता. तेव्हापासून गेल्या पाच वर्षांत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे. या मालिकेतील राधिका, शनाया, गुरुनाथ या पात्रांनी प्रेक्षकांचे मन जिंकली आहेत. सुरुवातीच्या काळात ही मालिकेने टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून या मालिकेची टीआरपीमध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे निर्मात्यांनी ही मालिकेचा शेवट करण्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे. हे देखील वाचा- Sara Ali Khan चा 'हा' ग्लॅमरस अंदाज पाहून चाहत्यांच्या खिळतील नजरा, See Pics
याशिवाय, 'रात्रीस खेळ चाले' या गाजलेल्या मालिकेचा तिसऱ्या पर्वाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे 'देवमाणूस'ही मालिका आता शेवटच्या टप्प्यात आल्याचे म्हटले जात आहे. तसेच ‘पाहिले न मी तुला’ या अगामी मालिकेच्या माध्यमातून अभिनेता शशांक केतकर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे 'लाडाची मी लेक गं' ही मालिकाही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 24, 2021 01:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

