‘धनंजय माने इथेच राहतात’; लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदी मराठी रंगभूमी वर पदार्पण करण्यासाठी सज्ज!
माने ची भूमिका साकारणार आहे तर तिच्यासोबत अभिनेता चैतन्य सरदेशपांडे हा धनंजय माने ही भूमिका साकारणार आहे. या नाटकाचं दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केलं आहे.
'धनंजय माने इथेच राहतात का?’या अशी ही बनवाबनवी चित्रपटातील डायलॉग आणि त्यापुढील सीन आजही अनेकांना पोट धरून हसायला लावेल. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या ओठी असलेल्या या अजरामर डायलॉगला धरूनच त्याची लेक स्वानंदी बेर्डे मराठी रंगभूमीवर पदार्पण करत आहे. स्वानंदीने इंस्टाग्राम वर खास पोस्ट करत तिच्या पहिल्या नाटकाची माहिती दिली आहे. स्वानंदी बेर्डेच्या आगामी नाटकाचं नाव 'धनंजय माने इथेच राहतात' असं आहे. तिने या नाटकाचं स्क्रिप्ट आणि सहकलाकाराचा फोटो पोस्ट केला आहे.
स्वानंदी बेर्डे या नाटकामध्ये सौ. माने ची भूमिका साकारणार आहे तर तिच्यासोबत अभिनेता चैतन्य सरदेशपांडे हा धनंजय माने ही भूमिका साकारणार आहे. या नाटकाचं दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केलं आहे. तर मीडीया रिपोर्ट्सनुसार या नाटकात अभिनेत्री प्रिया बेर्डे देखील झळकणार आहेत. अद्याप या नाटकाची मुहुर्ताची तारीख ठरलेली नाही. या नाटकाची रिहर्सल सुरू आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे पडली प्रेमात? अफेअरच्या चर्चा रंगू लागल्यानंतर डिलीट केली 'ती' भावनिक पोस्ट.
स्वानंदी बेर्डे ची पोस्ट
चैतन्य सरदेशपांडे पोस्ट
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनय कौशल्याने मराठी, हिंदी सिनेमांमध्ये अधिराज्य केले आहे. आता त्यांची दोन्ही मुलं कला क्षेत्रामध्ये उतरली आहे. स्वानंदी नाटकामधून या क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज होत आहे तर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याने ' ती सध्या काय करते' या मराठी सिनेमामधून सिनेक्षेत्रात आला आहे. आता तो बॉलिवूडमध्ये प्रभास सोबत आगामी सिनेमांत झळकणार आहे. अशी चर्चा आहे.