Adipurush: लोकप्रिय अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनव बेर्डे 'आदिपुरुष' चित्रपटात झळकणार? इंस्टाग्रामवर केली 'अशी' पोस्ट
Abhinay Berde (Photo Credit: Instagram)

'बाहुबली' चित्रपटातून खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेला दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याचा अगामी चित्रपट आदिपुरुष प्रदर्शित होण्याआधीच प्रचंड चर्चेत आहे. 'आदिपुरुष' (Adipurush) हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासंदर्भात चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी ट्विटरवर माहिती दिली होती. याचदरम्यान, मराठी चित्रपटातील चमकलेला तारा दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे (Abhinay Berde) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. अभिनयने इंस्टाग्रामवर  'आरंभ' असे कॅप्शन देत एक पोस्ट केली आहे.  या कॅप्शननंतर सोशल मीडियावर तो 'आदिपुरुष' या चित्रपटात काम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करताना दिग्दर्शकांनी आदिपुरुष चित्रपटाचे पोस्टर आणि 'आरंभ' असे म्हटले होते.

नुकताच अभिनय बेर्डे याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. याचबरोबर या पोस्टरला त्याने 'आरंभ' असे कॅप्शन दिले आहे. महत्वाचे म्हणजे, या कॅप्शनमुळे अभिनय बॉलिवूड पदार्पण करणार असल्याचे सोशल मीडियावर सांगितले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. हे देखील वाचा- Pavitra Rishta 2: सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा गाजलेला शो 'पवित्र रिश्ता'चा दुसरा सिझन लवकरच चाहत्यांच्या भेटीला; जाणून घ्या डीटेल्स

अभिनव बेर्डेची इंस्टाग्राम पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhinay toh Kabhinay (@abhinay3)

हा चित्रपट श्रीरामचंद्रांवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात प्रभास आणि सैफ अली खान मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात प्रभास प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणार आहे. तर, सैफ अली रावणाची भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट थ्रीडी अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून, भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. 2022 मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.