डॉ. श्रीराम लागू यांच्यावर आज होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; 11च्या सुमारास निघणार अंत्ययात्रा
श्रीराम लागू (Dr. Shreeram Lagoo) यांचे 17 डिसेंबरच्या रात्री वृद्धापकाळाने निधन झाले आहे. आज (20 डिसेंबर) पुण्यामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत.
ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. श्रीराम लागू (Dr. Shreeram Lagoo) यांचे 17 डिसेंबरच्या रात्री वृद्धापकाळाने निधन झाले आहे. आज (20 डिसेंबर) पुण्यामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत. दरम्यान हे अंत्यसकार शासकीय इतमामात होणार असून शिवसेनेचे मंत्री सुभाष देसाई सरकार कडून उपस्थित राहणार आहेत. डॉ. श्रीराम लागू यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यात बालगंधर्व रंगमंदिर येथे आज सकाळी 10 ते 11 या वेळेत ठेवले जाणार आहे. त्यानंतर अंतिम प्रवासाला सुरुवात होणार आहे. Dr. Shreeram Lagoo Dies: अमेय वाघ, उर्मिला मातोंडकर सह मराठी कलाकारांनी शेअर केले डॉ. श्रीराम लागू यांच्यासोबतचे 'खास क्षण'!
पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत डॉ. श्रीराम लागू यांच्यावर अंत्यंस्कार होणार आहेत. डॉ. लागू यांचा मुलागा अमेरिकेत होता त्याला पुण्यामध्ये परतल्यानंतर आता डॉ. लागू यांच्यावर अंतिम संस्कार होतील. दरम्यान आज सकाळी डॉ. लागूंच्या चाहत्यांना, नाट्य मंडळींना त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेता येणार आहे.
सातारा येथे 16 नोव्हेंबर 1927 रोजी डॉ. लागू यांचा जन्म झाला. तर, 1979 मध्ये लागू यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली. डॉ. श्रीराम लागू म्हणजे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टी यांचे एक चालतेबोलते विद्यापीठच होते. त्यांच्या जाण्यामूळे मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी रंगभूमी यांचे मोठे नुकसान झाल्याची भावना अनेक कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली आहे.