Dilbar Arabic Version: Nora Fathehi झळकली Arebic Dance च्या तालावर

अभिनेत्री नोरा फतेही ने पुन्हा एकदा अरब अंदाजात बेली डान्स करुन प्रेक्षकांना मोहून टाकले आहे.

अभिनेत्री नोरा फतेही (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

बॉलिवूडमध्ये यंदाच्या वर्षी सुपरहिट गाण्यामध्ये 'सत्यमेव जयते' (Satyameva Jayate)  या चित्रपटातील दिलबर- दिलबर (Dilbar)  हे गाण फारच लोकप्रिय झाले आहे. तसेच अभिनेत्री नोरा फतेही ने पुन्हा एकदा अरब अंदाजात बेली डान्स करुन प्रेक्षकांना मोहून टाकले आहे.

मॉडेल ते अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी नोरा फतेही (Nora Fathehi) ने दिलबर दिलबर हे बॉलिवूडचे गाणे अरब भाषेत (Arabic Language)  काढले आहे. तसेच या गाण्यात ती पुन्हा झळकली असून त्यासाठी तिने आवाज ही दिला आहे. तर या गाण्याला मोहसिन तिजाफ यांनी दिग्दर्शन केले असून अशरफ आरब यांनी लिहिले आहे.

परंतु 1999 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'सिर्फ तुम' मधील  दिलबर या गाण्यात पहिल्यांदा सुष्मिता सेन झळकली होती. या गाण्यामुळे नोराच्या चाहत्यांची संख्या खूप वाढले आहेत.