कोरोनाग्रस्त गायिका कनिका कपूर विरोधात गुन्हा दाखल; धोकादायक आजार पसरवल्याचा आरोप
धोकादायक आजार पसरवल्याच्या आरोपाखाली कनिका कपूर विरोधात लखनऊ येथे सरोजिनी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनिका कपूरने शुक्रवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली होती.
कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झालेल्या प्रसिध्द गायिका कनिका कपूर (Singer Kanika Kapoor) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धोकादायक आजार पसरवल्याच्या आरोपाखाली कनिका कपूर विरोधात लखनऊ येथे सरोजिनी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कनिका कपूरने शुक्रवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली होती.
दरम्यान, कनिका कपूरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. कनिकाला 14 मार्च रोजी कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. 11 मार्चला कनिका कपूर लंडनहून लखनऊला परतली होती. तिला कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं असतानाही ती लखनऊसह अनेक ठिकाणी पार्ट्यांना गेली. त्यामुळे धोकादायक आजार पसरवल्याच्या आरोपाखाली कनिका कपूर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा - महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 63 वर पोहचली; 21 मार्च 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE)
कनिका कपूर विरोधात भारतीय दंडविधानाच्या कलम 269, 270, 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.