Chanakya Movie: महाराष्ट्र के 'चाणक्य', राज्याची राजकिय परिस्थीतीचा आढावा घेणारा चित्रपट, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा थरार आता आगामी ‘चाणक्य’ (Chanakya) या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
Chanakya Movie: सद्य राज्याची राजकिय परिस्थिती पाहता आणि त्याच पार्श्वभुमीवर दिग्दर्शक निलेश नवलाखा यांनी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाच्या पोस्टरची पहीली झलक निलेश नवलाखा यांनी ट्विटर वरून शेअर केली. शाळा, फॅंड्री यासारखे चित्रपटाचे निर्माते निलेश यांनी केले आहे. या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील षडयंत्र आणि कट - कारस्थानाची कथा सांगणारा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चाणक्य असं या चित्रपटाला नाव देण्यात आले आहे. ट्विटरवर पोस्ट शेअर करत त्यांनी ना मे Tire हू ना मे Retire हू…. मे सिर्फ Fire हू… असं लिहलं आणि त्याच सोबत महाराष्ट्र के चाणक्य आज से फिर मैदान मे असं लिहत राजकिय नेत्याना टॅग करण्यात आले आहे. या पोस्टरमुळे सर्वीकडे चांगलेच चर्चा रंगली आहे. निलेश हे पहील्यांदा चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
चित्रपटाचं पोस्ट देखील धमाकेदार आहे. ज्यातून राजकीय परिस्थितीचे दर्शन होताना दिसत आहे. राजकिय परिस्थिती पाहता, राज्यात अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राजकिय परिस्थीचीचे चित्र बदलले पहायला मिळाले आहे. प्रेक्षकांना चित्रपटाची आतुरता लागली आहे. याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे घोषित केले आहे. या चित्रपटात राज्यातील राजकिय परिस्थीतीत होणारे सत्ताबदल, बंडखोरी, डावपेच पाहायला मिळणार आहे.