India At Grammy Awards 2024: Zakir Hussain यांनी ग्रॅमीत उंचवली भारतीयांची मान, रचला नवा इतिहास! पहा विजेत्या भारतीय कलाकारांची यादी
Zakir Hussain यांनी ग्रॅमीत यंदा एका रात्रीत 3 पुरस्कार पटकावून नवा विक्रम रचला आहे. तर बासरी वादक राकेश चौरसिया यांना 2 पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
अमेरिकेमध्ये 66 वा ग्रॅमी सोहळा (Grammy Awards) पार पडला आहे. जगभरातील संगीत क्षेत्रात काम करणार्या कलाकारांसाठी ग्रॅमी हा प्रतिष्ठीत पुरस्कारांपैकी एक आहे. यंदा या मानाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये भारतीय कलाकारांनीही विजेते पद पटकावत देशाची मान उंचावली आहे. Zakir Hussain यांनी ग्रॅमीत यंदा एका रात्रीत 3 पुरस्कार पटकावून नवा विक्रम रचला आहे. तर बासरी वादक राकेश चौरसिया (Rakesh Chaurasia) यांना 2 पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांच्या 'शक्ती' बॅन्ड ने देखील यंदा ग्रॅमी मध्ये पुरस्कार पटकावला आहे. या बॅन्ड मध्ये जाकिर हुसैन, वी सेल्वागणेश आणि गणेश राजगोपालन यांचाही समावेश आहे.
Zakir Hussain यांनी “Pashto" साठी Best Global Music Performance चा पुरस्कार पटकावला आहे. यामध्ये Bela Fleck आणि Edgar Meyer यांच्यासोबत Rakesh Chaurasia देखील होते. झाकीर हुसेन यांना 3 तर राकेश चौरसिया यांना 2 पुरस्कार मिळाले आहेत.
शंकर महादेवन यांच्या शक्ती बॅन्ड ने 'This Moment'साठी Best Global Music Album पटकावला आहे. शंकर महादेवन यांच्यासोबत या बॅन्डचा भाग Selvaganesh Vinayakram, Ganesh Rajagopalan, Ustad Zakhir Hussain देखील आहेत. 'This Moment, अल्बम मध्ये 8 गाणी आहेत. Grammy Awards 2024: गायिका Miley Cyrus ने जिंकला तिच्या संगीत कार्यकीर्दीतला पहिला वहिला Grammy पुरस्कार .
इथे पहा ग्रॅमी 2024 च्या संपूर्ण विजेत्यांची यादी
भारतीय कलाकारांच्या या ग्रॅमी मधील दमदार कामगिरीवर रसिकांकडून कौतुक केले जात आहे. Ricky Kej यांनी या पुरस्कारामुळे भारतीय कलाकारांसाठी हे सर्वोत्तम वर्षांपैकी एक ठरल्याचं म्हटलं आहे. तर आदित्य ठाकरेंनी देखील X वर पोस्ट करत कलाकारांचे अभिनंदन केले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)