Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी यशराज चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा यांची 4 तास चौकशी

मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत 36 जणांची चौकशी केली आहे. यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), संजय लीला भंसाली (Sanjay Leela Bhansali), सलमान खान (Salman Khan) ची माजी मॅनेजर रेश्मा शेट्टी (Reshma Shetty) यांचा समावेश आहे.

सुशांत सिंह राजपूत आणि आदित्य चोपड़ा (Photo Credits: Facebook, Wikipedia)

Sushant Singh Rajput Death: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्येप्रकरणी (Suicide) यशराज चित्रपट निर्माते आदित्य चोप्रा (Aditya Chopra) यांची चौकशी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत 36 जणांची चौकशी केली आहे. यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty), संजय लीला भंसाली (Sanjay Leela Bhansali), सलमान खान (Salman Khan) ची माजी मॅनेजर रेश्मा शेट्टी (Reshma Shetty) यांचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्य चोप्राने शनिवार सकाळी वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपला जबाब नोंदवला. यावेळी पोलिसांनी आदित्य यांची 4 तास चौकशी केली. यात सुशांत सिंहसोबत यशराज फिल्मसोबत केलेल्या करारांची आणि इतर व्यवहारांची माहिती घेण्यात आली. तसेच यशराज फिल्म्सवर झालेल्या आरोपांबाबतदेखील विचारणा करण्यात आली. याशिवाय आदित्य चोप्रा यांना 'पानी' चित्रपटासंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. (हेही वाचा - Pavitra Rishta Part 2: सुशांत सिंह राजपूत-अंकिता लोखंडे यांची लोकप्रिय मालिका 'पवित्र रिश्ता' चा दुसरा भाग बनवणार एकता कपूर?)

 

View this post on Instagram

 

#YashrajFilms #AdityaChopra statement recorded by #MumbaiPolice today morning in #SushantSinghRajput case #Saturday #ManavManglani #NewsAtManav #yashraj #mumbai

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतचा आदित्य चोपडा यांच्या यशराज फिल्म्ससोबत चित्रपट निर्मितीबाबत करार झाला होता. या करारात यशराज फिल्म्स सुशांतसोबत 3 चित्रपटांची निर्मिती करणार होते. परंतु, यातील केवळ 2 चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. यातील एका चित्रपटाची निर्मिती झाली नाही. त्यानंतर काही दिवसातचं सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केली. अद्याप सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.