XXX स्टार मिया मालकोवा च्या Climax चित्रपटाच्या ट्रेलरने इंटनेटवर लावली आग; 6 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला Hot Video
फिल्म क्लाइमेक्स ट्रेलर (Photo Credits: Youtube)

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्या Climax सिनेमाच्या ट्रेलर मध्ये दिसून आलेली XXX Star मिया मालकोवा (Mia Malkova) च्या हॉट सीनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने इंटरनेटवर आग लावली आहे. Climax सिनेमाचा ट्रेलर आतापर्यंत 6 लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

या चित्रपटात मियाने बिकिनीवर तसेच टॉपलेस होऊन अनेक किसिंग सीन दिले आहेत. तिच्या याच हॉटनेस ची झलक दाखवणारे काही खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रेक्षकांना मिया मालकोवा हिच्या चित्रपटातील कामाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. या ट्रेलरमध्ये मिया बोल्ड अंदाजात पाहायला मिळाली आहे. (हेही वाचा - XXX स्टार मिया मालकोवा ने Climax सिनेमाच्या ट्रेलर मध्ये आपल्या हॉटनेसने लावली आग; 'हे' पाच फोटो तर आहेत खूपच सेक्सी)

दोन मिनिटांच्या क्लायमॅक्स चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. दरम्यान, क्लायमॅक्सच्या ट्रेलरमध्ये सस्पेंस आणि बोल्डनेस पाहायला मिळतो. ट्रेलरमध्ये मिया आपल्या पार्टनरसोबत रेगिस्तान ट्रिप मध्ये दिसत आहे. यात ते दोघेही रोमॅंटीक जर्नीवर असल्याचे पाहायला मिळते. ट्रीपदरम्यान काही घटना अशा घडतात ज्याची या दोघांना कल्पना नसते. या चित्रपटावर कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे हा चित्रपच नेमका कधी प्रदर्शित होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.