PM Narendra Modi या बायोपिकमधून 'ही' अभिनेत्री साकारणार 'जसोदाबेन' यांची भुमिका

मात्र आता चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे मोदी यांच्या पत्नीची मुख्य भुमिका कोण साकारणारा आहे. तर जसोदाबेन (Jashodaben) यांची मुख्य भुमिका 'ही' अभिनेत्री साकारणार असल्याचे सांगितले जात आहे.

PM Narendra Modi Biopic (Photo credits-twitter)

PM Narendra Modi Biopic: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आयुष्यावर आधारिक बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर पीएम नरेंद्र मोदी असे या बायोपिकचे नाव असून अभिनेता विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) मोदी यांची मुख्य भुमिका साकारणार आहे. मात्र आता चर्चा सुरु झाली आहे ती म्हणजे मोदी यांच्या पत्नीची मुख्य भुमिका कोण साकारणारा आहे. तर जसोदाबेन (Jashodaben) यांची मुख्य भुमिका 'ही' अभिनेत्री साकारणार असल्याचे सांगितले जात आहे.

जसोदाबेन म्हणजेच नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यातील अर्धांगिनी. त्यांची भुमिका अभिनेत्री बरखा बिष्ट (Barkha Bisht/Sengupta) साकारणार आहे. याबाबत बरखा हिला विचारले असता तिने, या चित्रपटाचे शूटिंग अहमदाबाद येथे होणार असून मोदी यांच्या आयुष्यातील कथांवर वाचण्यास सुरुवात केली असल्याचे म्हटले आहे. तसेच जसोदाबेन यांची भुमिका साकरणे अत्यंत कठीण आहे. तरीही जसोदाबेन यांची भुमिका मी यशस्वीपणे साकारणार असल्याचे बरखाने सांगितले.(हेही वाचा-PM Narendra Modi Biopic First Look : नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत बायोपिकचा फर्स्ट लूक प्रदर्शित)

बरखा ही जसोदाबेन यांच्या मुख्यभुमिकेसाठी गुजराती भाषा सध्या शिकत आहे. तसेच मोदी यांच्या पत्नीची मुख्य भुमिका मला साकारण्यास मिळ्याने बरखा खुप खुश दिसून येत आहे.