ऐकावे ते नवलच! कोरोना व्हायरस लढ्यासाठी रजनीकांतने अधिक मदत केली का विजयने? चाहत्यांमध्ये झालेल्या भांडणात एकाचा मृत्यू

म्हणजेच दोन सेलेब्जच्या चाहत्यांमधील लढाई. सहसा ही लढाई सोशल मीडियावरील गैरवर्तन आणि धमक्यांपुरती मर्यादित असते

Rajinikanth, Thalapathy Vijay (Photo Credits: Instagram)

आपण सर्वांनी गँग वॉर तर ऐकलेच असेल, त्यासारखाच एक प्रकार आहे फॅन वॉर. म्हणजेच दोन सेलेब्जच्या चाहत्यांमधील लढाई. सहसा ही लढाई सोशल मीडियावरील गैरवर्तन आणि धमक्यांपुरती मर्यादित असते. पण आता जे प्रकरण समोर आले आहे ते याच्या चार नाही तर दहा पावले पुढे गेले आये. दक्षिणेच्या दोन सुपरस्टारच्या चाहत्यांमध्ये भांडण झाले, त्यात एका सेलेब्जच्या चाहत्याने दुसऱ्या सेलेब्जच्या चाहत्याचा चक्क खून केला. ऐकायला आश्चर्यकारक वाटत असेल पण हे खरे आहे. कोरोना व्हायरसशी सामना करण्यासाठी रजनीकांत (Rajinikanth) आणि विजय (Vijay) अशा सुपरस्टार्स पैकी कोणी अधिक पैसे दान केले याबद्दल हा वाद होता.

रजनीकांत आणि थलपथी विजय हे दोन दक्षिणेचे सुपरस्टार आहेत. मार्चमध्ये रजनीकांत यांनी, एफईएफएसआय (Film Employees Federation of South India) चे अध्यक्ष आर.के. सेल्वामनीच्या विनंतीनुसार, रोजंदारी कामगारांना मदत करण्यासाठी पैसे दिले. रजनीकांत यांनी त्यावेळी एकूण 50 लाख रुपयांचे योगदान दिले होते. अहवालानुसार एफईएफएसआयने जितकी रक्कम जमा करण्याचे टारगेट ठेवले होते त्याच्या 25 टक्के ही रक्कम होती. याशिवाय रजनीकांत  इतरही वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहेत.

त्यानंतर सुपरस्टार जोसेफ विजयने 6 राज्यांच्या मुख्यमंत्री मदत निधीसह पीएम-फंडालाही मदत केली. याशिवाय शुटींग थांबल्यामुळे अडचणीत आलेल्या कामगारांच्या मदतीसाठी एफईएफएसआयला 25 लाख रूपये देण्याची घोषणा केली. अशाप्रकारे विजयने एकूण 1.30 कोटी रुपयांची देणगी दिली. (हेही वाचा: Lockdown मुळे त्रासलेल्या रोजंदारी कामगारांच्या मदतीसाठी सरसावली कैटरीना कैफ; कामगारांना अन्न, स्वच्छता सुविधा पुरवणाऱ्या De’haat Foundation ला पाठिंबा)

या प्रकरणाबाबत विजय आणि रजनीकांतचे चाहते आपसात भिडले. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तामिळनाडुच्या विल्लुपुरममध्ये युवराज आणि दिनेश बाबू नावाच्या दोन 22 वर्षांच्या मुलांमध्ये याबाबत वाद झाला. युवराज विजय फॅन होता आणि दिनेश रजनी भक्त. दारूची दुकाने बंद असूनही दोघेही नशेत होते अशावेळी दोन्ही सुपरस्टार्सच्या देणगीची बाब चर्चेत आली. कोणी अधिक पैसे दिले यावरून मोठा वाद सुरु झाला. वातावरण इतके तापले की, दिनेशने युवराजला ढकलले व पडल्यामुळे युवराजच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. आता पोलिसांनी दिनेश बाबूला ताब्यात घेतले आहे व या प्रकरणाचा तपास चालू आहे.