बॉलिवूडमध्ये होणार 'या' नव्या Star Kid चे पदार्पण
आसमान भारद्वाज (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक स्टार किड्सनी पदार्पण केले आहे. त्यात आता नवीन एका स्टार किड्सची भर पडणार आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी (Pooja Bedi) हिची मुलगी आलिया फर्निचरवाला (Aalia Furniturewalla) सुद्धा सैफ अली खान सोबत तिच्या आगामी चित्रपटातून लवकरच झळकणार आहे. 'हा' नवा स्टार किड्स मधील चेहरा आहे तरी कोण?

प्रख्यात दिग्दर्शक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) आणि गायिका रेखा भारद्वाज (Rekha Bhardwaj) यांचा मुलगा आसमान (Aasmaan Bhardwaj) बॉलिवूडमध्ये लवकरच आपले पाऊल ठेवणार आहे. परंतु अभिनयातून नाही तर दिग्दर्शनातून तो बॉलिवूडमध्ये झळकणार आहे. वडील विशाल यांच्या पावलावर पाऊल ठेवत आसमान ह्याने दिग्दर्शन करण्याचे ठरविले आहे. दिग्दर्शनाची तयारी आसमानने अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) याचा 'कमिने' (Kaminey) चित्रपटापासून केली.त्यावेळी वडिलांसोबत या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शनाचे काम केले.

 

View this post on Instagram

 

#BornToFilm

A post shared by Aasmaan V Bhardwaj (@aasmaanbhardwaj) on

 

View this post on Instagram

 

To be the best, you have to learn from the best. #Pataakha is out in theaters, please go watch it.

A post shared by Aasmaan V Bhardwaj (@aasmaanbhardwaj) on

अलीकडेच आसमान हा विदेशात दिग्दर्शानाचे धडे घेऊन भारतात आला आहे. तर रेखा भारद्वाज यांनी ही येत्या मे महिन्यात त्याला दिग्दर्शन क्षेत्रात घेऊन येणार असल्याचे सांगितले आहे. आसमानचा पहिलाच दिग्दर्शन असणाऱ्या चित्रपटाची कथा ही रहस्यमय आणि थ्रीलर असणार आहे.